मुंबई - दिल्ली आणि आसपासच्या परिसरात गुरूवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गुरुग्रापासून ४८ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
याआधी २ डिसेंबर रोजी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू गाजियाबाद होता. सकाळी ४ वाजून ५ मिनिटाला हे धक्के जाणवले होते.
दरम्यान, या वर्षी अनेकदा दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. एप्रिल महिन्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात १५ हून अधिक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीच्या जवळपासच्या परिसरात होता.
दिल्लीत मोठ्या भूकंपाची शक्यता
याआधी देशातील वरिष्ठ वैज्ञानिकांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कधीही मोठा भूकंप येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. भूकंपबाबत अभ्यास करणारी देशातील प्रमुख संस्था द नॅशनल सेंटर ऑफ सीसमोलॉजी यांनी सांगितले की, मागील अनेक महिन्यांपासून दिल्लीत अनेकदा भूकंप झाला आहे. जवाहरलाल नेहरू सेंटर ऑफ अॅडव्हान्स सायटिफिक रिसर्चमध्ये प्राध्यपक सी. पी. राजेंद्रन यांनी, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कधीही मोठा भूकंप येऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे.
हेही वाचा - केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आंदोलक शेतकऱ्यांना पत्र, शंका दूर करण्याचे लेखी आश्वासन
हेही वाचा - विवाहाचे वचन देऊन ठेवलेला शरीरसबंध बलात्कार नव्हे - दिल्ली उच्च न्यायालय