भिंड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून सोशल डिस्टन्स आणि स्वच्छतेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले जात आहेत. भिंडमध्ये जिल्हा वैज्ञानिक अधिकारी तसेच स्पेशल डॉक्टर अजय सोनी यांनी खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून संसर्ग होऊ नाही, यासाठी अल्ट्रावॉयलेट सॅनिटायझेशन ट्रंक तयार केले आहे. यामध्ये खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू ठेवल्यानंतर त्यांना डिसइन्फेक्ट करता येऊ शकते.
कसा आहे सॅनिटायझेशन ट्रंक -
या ट्रंकला बनवण्यासाठी डॉक्टर अजय यांना भिंडचे एसीपी नागेंद्र सिंह यांच्याकडून प्रेरणा मिळाली. अजय यांनी यासाठी संदुकचा वापर केला. त्यामध्ये त्यांनी अल्ट्राव्हायलेट लाईटचा वापर केला. त्यांनतर एका अडॉप्टरच्या माध्यमातून ऊर्जा पुरवठा करण्यात आली. यासाठी केवळ अडीच हजार रुपयांचा खर्च लागला.
अल्ट्राव्हायलेट किरणं हे मानवासाठी घातक आहेत. त्यामुळे त्याचा वापर सावधगीरीने करता आला पाहिजे, असे अजय सोनी यांनी सांगितले.