नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लीम आयएसआयसाठी काम करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
-
#WATCH MP: Congress leader Digvijaya Singh says, "Bajrang Dal, Bharatiya Janata Party (BJP) are taking money from ISI (Inter-Services Intelligence). Attention should be paid to this. Non-Muslims are spying for Pakistan's ISI more than Muslims. This should be understood." (31.08) pic.twitter.com/NPxltpaRZA
— ANI (@ANI) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH MP: Congress leader Digvijaya Singh says, "Bajrang Dal, Bharatiya Janata Party (BJP) are taking money from ISI (Inter-Services Intelligence). Attention should be paid to this. Non-Muslims are spying for Pakistan's ISI more than Muslims. This should be understood." (31.08) pic.twitter.com/NPxltpaRZA
— ANI (@ANI) September 1, 2019#WATCH MP: Congress leader Digvijaya Singh says, "Bajrang Dal, Bharatiya Janata Party (BJP) are taking money from ISI (Inter-Services Intelligence). Attention should be paid to this. Non-Muslims are spying for Pakistan's ISI more than Muslims. This should be understood." (31.08) pic.twitter.com/NPxltpaRZA
— ANI (@ANI) September 1, 2019
पाकिस्तानच्या गुप्तचर आयएसआय संघटनेसाठी मुस्लिमांपेक्षा गैरमुस्लीम काम करत आहेत. तर बजरंग दल आणि भारतीय जनता पक्ष आयएसआयकडून पैसे घेत आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्था बिघडवली असून देशात रोजगार नाहीत. मोदींनी सर्व गोष्टी सोडून अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा
यापुर्वी दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटले होते. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलेले आहे. एका जाहीर सभेत ते म्हणाले की, आजकल गुगलवर फेकू टाईप केले तर कोणाचा फोटो येतो? दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना देशाचे पंतप्रधान सगळ्यात खोटे आहेत. ते खूप खोटं बोलतात असं दिग्विजय सिंह म्हणाले होते.