नवी दिल्ली - दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन सुरू आहे. या परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहीन बाग परिसर खाली करण्याचे वक्तव्य हिंदू सेनेने शनिवारी केले होते. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
-
Delhi: Heavy police deployment in Shaheen Bagh as a precautionary measure, even after Hindu Sena yesterday called off protest site clearance call pic.twitter.com/5LVwLcaaoO
— ANI (@ANI) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Heavy police deployment in Shaheen Bagh as a precautionary measure, even after Hindu Sena yesterday called off protest site clearance call pic.twitter.com/5LVwLcaaoO
— ANI (@ANI) March 1, 2020Delhi: Heavy police deployment in Shaheen Bagh as a precautionary measure, even after Hindu Sena yesterday called off protest site clearance call pic.twitter.com/5LVwLcaaoO
— ANI (@ANI) March 1, 2020
शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विवादित नारगरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. या धरणे आंदोलनामुळे नोएडा आणि फरिदाबादकडे जाणारे मार्गही बंद झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी ३ मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. आंदोलकांना पर्यायी मार्ग देण्याचा पर्याय समोर ठेवण्यात आला होता. मात्र, शाहीन बाग परिसरात आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारामुळे दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव शाहीन बाग परिसरात सुरक्षा वाढवली आहे. तसेच जमावबंदी लागू केली आहे. काही दिवसांपूर्वी नोएडाकडे जाणारा ९ नंबर मार्ग एका बाजूने खुला करण्यास आंदोलक तयार झाले होते.
या आंदोलकांवर गोळीबार होण्याचीही घटना घडली आहे. शाहीन बागेपासून गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले.