नवी दिल्ली - तीस हजारी न्यायालयाच्या आवारात शनिवारी पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एसपी गर्ग यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
-
Delhi High Court has ordered a judicial inquiry to be completed within 6 weeks under retired judge of Delhi High Court SP Garg, in connection with yesterday's clash between police & lawyers at Tis Hazari Court. https://t.co/AWqBUhpBUZ
— ANI (@ANI) November 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi High Court has ordered a judicial inquiry to be completed within 6 weeks under retired judge of Delhi High Court SP Garg, in connection with yesterday's clash between police & lawyers at Tis Hazari Court. https://t.co/AWqBUhpBUZ
— ANI (@ANI) November 3, 2019Delhi High Court has ordered a judicial inquiry to be completed within 6 weeks under retired judge of Delhi High Court SP Garg, in connection with yesterday's clash between police & lawyers at Tis Hazari Court. https://t.co/AWqBUhpBUZ
— ANI (@ANI) November 3, 2019
संबधीत घटनेमध्ये जखमी वकिलांची साक्ष नोंदवून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात येणार आहे. येत्या 6 आठवड्याच्या आत तपास पुर्ण करून न्यायालयात अहवाल जमा करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाने गोळीबारामध्ये जखमी झालेल्या वकिल विजय वर्मा यांना 50 हजार रुपये आणि अन्य 2 वकिलांना प्रत्येकी 15 हजार आणि 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
शनिवारी दिल्लीच्या तिस हजारी न्यायालयामध्ये पोलीस आणि वकील यांच्यात झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. पोलिसांच्या गोळीबारानंतर संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली असून वाहने पेटवून दिल्याची घटना घडली. यामध्ये 20 हून अधिक पोलीस जखमी झाले असून पोलिसांनी केल्या गोळीबारामध्ये सुरेंद्र वर्मा नावाच्या वकिलाला गोळी लागली होती. माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाल्याचीही माहिती आहे.