नवी दिल्ली - अम्फान सुपर सायक्लोनमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानी व वित्त हानीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पीडित जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानाची माहितीने मला धक्का बसला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी पीडित जनतेला मदत सर्वोतपरी मदत करावी. चक्रीवादळामध्ये मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळामुळे 72 लोकांचा मुत्यू झाला असून 1 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'अम्फान' या महाचक्रीवादळाने झालेल्या भयंकर नुकसानीचा आढावा घेणार आहे. अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या असून कोलकाता विमानतळ सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या वादळामुळेच ओडिशातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.