ETV Bharat / bharat

गेल्या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफने केला तब्बल २१५ दहशतवाद्यांचा खात्मा

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सच्या (सीआरपीएफ) गेल्या वर्षातील कामगिरीबाबत माहेश्वरी माहिती देत होते. यावेळी त्यांनी सांगितले, की २०२०मध्ये सीआरपीएफने नक्षलग्रस्त भागातील ३२ माओवाद्यांना ठार केले. तसेच, ५६९ माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय, ३४० नक्षलवादी सीआरपीएफला शरणही आले आहेत. यासोबत, 'कोब्रा' फोर्सेसनी सात माओवाद्यांना ठार केले होते, तर सुमारे ३०० आयईडी जप्त केले होते.

CRPF says 215 terrorists neutralized in J&K last year protecting 62 VIPs
गेल्या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफने केला तब्बल २१५ दहशतवाद्यांचा खात्मा
author img

By

Published : Jan 21, 2021, 7:25 PM IST

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षात सीआरपीएफने तब्बल २१५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर रियाझ नाईकू याचाही समावेश होता, अशी माहिती सीआरपीएफचे पोलीस महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी गुरुवारी दिली.

सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सच्या (सीआरपीएफ) गेल्या वर्षातील कामगिरीबाबत माहेश्वरी माहिती देत होते. यावेळी त्यांनी सांगितले, की २०२०मध्ये सीआरपीएफने नक्षलग्रस्त भागातील ३२ माओवाद्यांना ठार केले. तसेच, ५६९ माओवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय, ३४० नक्षलवादी सीआरपीएफला शरणही आले आहेत. यासोबत, 'कोब्रा' फोर्सेसनी सात माओवाद्यांना ठार केले होते, तर सुमारे ३०० आयईडी जप्त केले होते.

कोब्रामध्ये आता महिलांनाही प्रवेश?

माहेश्वरी यांनी सांगितले की सीआरपीएफ सध्या आपल्या विशेष 'कोब्रा' फोर्समध्ये महिलांनाही संधी देण्याचा विचार करत आहे. कमांडो बटालियन फॉर रेस्क्यू अ‌ॅक्शन (कोब्रा) पथके ही मुख्यत्वे नक्षलग्रस्त भागात आणि अति संवेदनशील भागात तैनात करण्यात येतात.

व्हीआयपी सिक्युरिटीमध्ये वाढ..

आमचे व्हीआयपी सिक्युरिटी पथक हे सातत्याने वाढत असून, सध्या देशात त्याचे ६२ संरक्षक आहेत. तसेच, ग्रेटर नोएडामध्ये आमचे एक व्हीआयपी प्रशिक्षण केंद्रही आहे. तसेच, सीआरपीएफचे बंगळुरूमध्ये एक श्वान प्रशिक्षण केंद्रही आहे. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये लवकरच तीन स्वदेशी जातींच्या श्वानांचाही समावेश करण्यात येणार आहे, असेही माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 'कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.