हैदराबाद - देशात बुधवारी 83 हजार 347 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 56 लाखांवर गेली आहे. तर 45 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तर भारत बायोटेक या कंपनीने अमेरिकेतील सेंट लुईस येथील वाशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिन सोबत 'चिंप-अडेनोव्हायरस' या कोविड 19 च्या एकल डोस इंट्रानेसल लससाठी परवाना करार केला.
- दिल्ली -
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोसिया यांना कोरोनामुळे बुधवारी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या 48 वर्षीय नेत्याला येथील सरकारी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते गृह विलगीकरणात होते.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन बुधवारी म्हणाले, राजधानीत खासगी रुग्णांलयातील विशेषत: आयसीयूत बेड्सची कमी नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राजधानीत वैद्यकीय ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नाही.
- महाराष्ट्र -
मुंबई - कोविड रूग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरची तुकडी औषधाची "उप-मानक गुणवत्ता" लक्षात घेता मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. या कारवाईमुळे राज्यात औषधांची अल्प मुदतीची कमतरता निर्माण झाल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, मागील 24 तासांत 253 महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच राज्यातील एकूण 21 हजार 827 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 18 हजार 158 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 234 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 435 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली.
- कर्नाटक -
बंगळुरू - काँग्रेस आमदार बी. नारायण राव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती बुधवारी डॉक्टरांनी दिली.
- राजस्थान/छत्तीसगड -
जयपूर/रायपूर - राज्यात कोविडच्या रुग्णसंख्येत तीव्र वाढ झाल्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यांमध्ये जनतेवर निर्बंध घातले आहेत.
- पंजाब -
चंदीगड - राज्य सरकारने खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर कमी केले आहेत. कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी सर्व करासंह 1 हजार 600 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत. तर ट्रू नॅट टेस्टसाठी खासगी प्रयोगशाळेने 2 हजार पेक्षा जास्त पैसे आकारु नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच सीबीएनएएटी चाचणीसाठी 2 हजार 400 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.