ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर... - national news

देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजार 492 इतकी झाली आहे. यात 2 लाख 20 हजार 114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 47 हजार 978 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 17 हजार 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COVID-19 news from across the nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
author img

By

Published : Jul 2, 2020, 1:09 AM IST

हैदराबाद - देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजार 492 इतकी झाली आहे. यात 2 लाख 20 हजार 114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 47 हजार 978 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 17 हजार 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COVID-19 news from across the nation
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी...

दिल्ली -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, 'दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. एक महिन्यापूर्वी दिल्लीतील स्थिती बिकट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण सद्यस्थिती पाहिल्यास, दिल्लीत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आनंदाची बाब आहे. दिल्लीत 30 जूनपर्यंत 1 लाख रुग्ण असतील, असा अंदाज होता. यात 60 हजार अॅक्टिव्ह रुग्ण असतील, असा कयास होता. पण सद्य स्थिती पहिल्यास दिल्लीत 26 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आम्ही यावर आणखी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.'

-----------------------------------------------------

मध्य प्रदेश -

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी डॉक्टर डेच्या निमित्ताचे औचित्य साधून 'किल कोरोना' या अभियानाला सुरूवात केली. या अभियानाअंतर्गत डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे अभियान 15 दिवस चालणार असून यात 2.5 लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोविड-19 सह इतर आजारांचीही तपासणी यात केली जाणार आहे. दिवसाकाठी 15 ते 20 हजार लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुरैना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, 15 दिवस कर्फ्यू वाढवण्यात येऊ शकतो.

राजस्थान -

आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी 9 वाजता जिल्हा कारागृहात 26 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. प्रतापगड जिल्ह्यात सध्या कोरोनाची 28 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात सर्वात पहिला रुग्ण गोळीबार प्रकरणात अटक केलेला आरोपी होता. दरम्यान, जिल्हा कारागृहातील कर्मचार्‍यांची तपासणी करून कैद्यांना हलविण्याची तयारीही सुरू आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक शिवेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील कैद्यांची तपासणी झाल्यानंतर अधिकार्‍यांच्या आदेशानुसार पुढील रूपरेषा आखली जाणार आहे.

उत्तराखंड -

उत्तराखंड राज्यात 66 नवे रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 947 इतकी झाली आहे. यात 2 हजार 317 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. तर आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सद्य घडीला 562 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये कोरोना रिकव्हरीचा दर 78.62 टक्के आहे.

छत्तीसगड -
छत्तीसगड सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 20, तर सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) 2 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जवान कांकेरच्या जिल्ह्यात तैनात होते. जगदलपूरच्या डिमरापाल रुग्णालयात जवानांवर उपचार सुरू आहेत.

गुजरात -

आरोग्य विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मणिनगर परिसरीत एका मंदिराच्या, स्वामीनारायण संप्रदायाच्या अकरा साधूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणच्या रुग्णालयावर उपचार सुरू आहेत.

बिहार -

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार पार झाली आहे. बुधवारी आरा जिल्ह्यातील एक पोलीस अधीक्षकासह चौघे जण कोरोनाबाधित आढळून आले. मागील 24 तासांमध्ये राज्यात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्ण संख्या पाहून राज्यात दिलेल्या सूचनाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

झारखंड -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 490 इतकी झाली आहे. यात 591 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.