ETV Bharat / bharat

COVID-19 Update: भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला; 28 हजार 498 नव्या रुग्णांची नोंद - कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्र

देशभरात मागील 24 तासांत 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 23 हजार 727 झाली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 63.02 टक्के आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2020, 1:19 PM IST

नवी दिल्ली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण देशातही दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील 24 तासांत 28 हजार 498 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात कोरोनाचे एकूण रुग्ण 9 लाख 6 हजार 752 झाले आहेत. यातील 3 लाख 11 हजार 565 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 71 हजार 459 जण उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आले आहेत.

देशभरात मागील 24 तासांत 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 23 हजार 727 झाली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 63.02 टक्के आहे. तर बरे होणारे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण 96.01 : 3.99 एवढे आहे.

सर्वात जास्त प्रभावीत राज्य महाराष्ट्र

कोरोना संसर्गांमुळे देशात सर्वात प्रभावीत महाराष्ट्र राज्य आहे. राज्यामध्ये 2 लाख 60 हजार 924 रुग्ण झाले आहेत. तर 10 हजार 482 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडू राज्यात 1 लाख 42 हजार रुग्ण असून 2 हजार 32 जण दगावले आहेत. तर राजधानी दिल्लीत 1 लाख 13 हजार 740 एकूण रुग्ण असून 3 हजार 411 जणांचा मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 1 कोटी 20 लाख 92 हजार 503 जणांचे नमूने 13 जुलैपर्यंत तपासण्यात आले आहेत. सोमवारी एकाच दिवसात 2 लाख 86 हजार 247 नमूने तपासण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.