नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 183 नवीन कोरोनाबाधित प्रकरणे समोर आली असून कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 903 वर पोहचली आहे. तर दिल्लीमध्ये शुक्रवारी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांध्ये दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतलेले 584 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील मृताची संख्या ही 14 वर पोहचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 26 जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतातील कोरोना साथीच्या आजारामुळे 6 हजारहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.