ETV Bharat / bharat

अमेरिकेत ११ डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता; 'फायझर'चा पुढाकार - फायझर कोरोना लसीकरण

गेल्या आठवड्यातच कंपनीने अमेरिकेतील फूड अँड ड्रग्ज प्रशासनाकडे या लसीचा गंभीर रुग्णांवर वापर करण्यासाठीची परवानगी मागितली होती. फायझरच्या अर्जावर विचार करण्यासाठी एफडीएच्या कोरोना लस सल्लागार समितीची बैठक १० डिसेंबरला होणार आहे. या बैठकीमध्ये फायझरला परवानगी मिळाल्यास, २४ ते ४८ तासांमध्ये आम्ही देशात ठिकठिकाणी आमची लस पोहोचवू. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Corona vaccination might begin in America on 11th of December
अमेरिकेत ११ डिसेंबरपासून कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता; 'फायझर'चा पुढाकार
author img

By

Published : Nov 24, 2020, 8:19 AM IST

हैदराबाद : अमेरिकेतील औषधनिर्माण कंपनीने कोरोनाच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ११ किंवा १२ डिसेंबरपासून अमेरिकेत लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. कोरोनाशी आपण देत असलेल्या लढाईमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

अमेरिकेतील फायझर आणि जर्मनीमधील बायोएनटेक या दोन औषधनिर्माण कंपन्या संयुक्तपणे एका कोरोना लसीची निर्मिती करत आहेत. ही लस कोरोनावर ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने अमेरिकेतील फूड अँड ड्रग्ज प्रशासनाकडे या लसीचा गंभीर रुग्णांवर वापर करण्यासाठीची परवानगी मागितली होती.

१० डिसेंबरला बैठक; १२ पर्यंत डोस पोहोचवण्याची तयारी

फायझरच्या अर्जावर विचार करण्यासाठी एफडीएच्या कोरोना लस सल्लागार समितीची बैठक १० डिसेंबरला होणार आहे. या बैठकीमध्ये फायझरला परवानगी मिळाल्यास, २४ ते ४८ तासांमध्ये आम्ही देशात ठिकठिकाणी आमची लस पोहोचवू. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

इतर लसीही शर्यतीत

कोरोनावर उपचारासाठी फायझरसोबतच मॉडर्ना, स्पुटनिक-५ या लसीही शर्यतीत आहेत. या सर्व लसी ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सिरम इन्स्टिट्यूट ही डिसेंबरपर्यंत कोव्हिशील्डचे दहा कोटी डोस तयार करण्याचा विचार करत आहे. यासोबतच, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची लस कोव्हॅक्सिनही लवकरच आपल्या चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू करणार आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर संयुक्तपणे या लसीची निर्मिती करत आहेत.

कोव्हिशील्ड ७० टक्के प्रभावी..

ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशील्ड ही लस सरासरी ७० टक्के प्रभावी असल्याचे आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये समोर आले आहे. पहिल्या चाचण्यांमध्ये ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये ही लस ६२ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही लस सरासरी ७० टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

केवळ लसी पुरेशा नाहीत

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी मात्र कोरोनाच्या लढाईत केवळ लसी पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. कोरोनावरील लस ही आपल्या या लढाईत मदत करेल. मात्र, सध्या असलेल्या वैद्यकीय साधनांची जागा ही लस घेईल असा विचार करणे चुकीचे ठरेल असे टेड्रोस म्हणाले.

हेही वाचा : स्पुटनिक, मॉडर्ना आणि फायझर लस.. कोरोनावर ९० टक्क्यांहून प्रभावी असण्याचा सर्वांचा दावा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.