नवी दिल्ली – भारत-चीन सीमारेषेवर तणावाच्या स्थितीवरून माजी केंद्रीय वित्तीय मंत्रालय पी. चिदंबरम यांनी सत्तेत असलेल्या केंद्र सरकारवर टीका केली. लडाखमधील गलवान खोऱ्यातील स्थिती चीनने एप्रिलमध्ये बदलली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भूभाग सुरक्षित राहिल्याबाबतचे विधान विसंगत असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ अधिकारी पी. चिदंबरम यांनी एकामागून एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की विदेश मंत्रालय आणि पीएलएने (पिपल्स लिब्रेशन आर्मी) पुन्हा एकदा पूर्ण गलवान खोऱ्यावर दावा केला आहे. भारताने गलवान खोरे रिकामे करावे, अशी चीनने मागणी केली आहे. ही मागणी असामान्य आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारने पुन्हा एकदा भारताचा दावा करणार आहे का? आणि ‘जैसे थे’ची स्थितीची मागणी करणार का, असा प्रश्न चिदंबरम यांनी ट्विटमधून उपस्थित केला.
काय आहे लडाखमधील स्थिती?
चिनी सैनिकांनी 'पोस्ट 14' या ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तसेच टेहळणी केंद्रही सुरू केले आहे. चीनचे सैनिक हे मोठ्या संख्येने परतल्याचे सूत्राने सांगितले. दोन्ही देश या ठिकाणावरून सैनिक मागे घेण्यासाठी सहमत झाले होते.
सूत्राच्या माहितीनुसार कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर भारत आणि चीनमध्ये 22 जूनला बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये तणाव होत असलेल्या पूर्व लडाखमधून सैनिक मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. ही कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर 6 जूननंतर दुसरी बैठक होती.
15 जूनला गलवानच्या खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत 20 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यापूर्वी चीनने या प्रदेशात भारतीय सैनिक कसे तैनात आहे, हे पाहण्यासाठी थर्मल इमेजिंग ड्रोन्सचा वापर केला होता. त्यादिवशी चिनी सैनिकांनी केलेला सर्वात मोठा प्राणघातक हल्ला होता, असे सरकारी सूत्राने सांगितले.