ETV Bharat / bharat

काँग्रेस पक्षात अनेक बदल; गुलाम नबींसह चार महासचिवांना केले पदमुक्त - काँग्रेस कृती समिती ताज्या बातम्या

पक्षात नेतृत्वासंदर्भात बदल करण्यासाठी काँग्रेसमधील २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना काही दिवसांपुर्वी पत्र लिहीले होते. यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली होती. पुढील ६ महिन्यात पक्ष अध्यक्ष निवडण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पक्षात अनेक बदल करण्यात आले आहेत.

काँग्रेस कृती समिती
काँग्रेस कृती समिती
author img

By

Published : Sep 12, 2020, 2:58 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षात अनेक बदल केले आहेत. यात गुलाम नबी आझादांसह पक्षातील ४ वरिष्ठ नेत्यांना पक्षाच्या महासचिव पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करण्यात आले आहे. यासोबतच काँग्रेस कृती समितीचीही पुन:स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेस कृती समितीमध्ये आता २२ सदस्य असणार आहेत.

पक्षाचे संगठन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद, मोतीलाल वोरा, अंबिका सोनी आणि मल्लिकार्जुन खडगे यांना पक्षाच्या महासचिव पदावरून मुक्त करण्यात आले आहे. संगठने बदल करण्यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहीणाऱ्या २३ नेत्यांमधील आझादांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे आझाद यांना काँग्रेस कृती समितीत स्थान देण्यात आले आहे. ही समिती सोनिया गांधी यांना पक्षातील महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. या समितीमध्ये एके एंटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. यासह सुरजेवाला आणि तारिक अनवर यांना पक्षाचे महासचिव नियुक्त करण्यात आले आहे.

Congress re-constitutesCongress re-constitutes
केसी वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक - 1
Congress re-constitutes
केसी वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक - 2
Congress re-constitutes
केसी वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक - 3

हरीश रावत यांना पंजाब काँग्रेसचे प्रभारी महासचिव, मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेश चे प्रभारी महासचिव, राजीव शुक्ला यांना हिमाचला प्रदेशचे प्रभारी, जितीन प्रसाद यांना पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार चे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासह विवेक बंसल यांना हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांना कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी पुन्हा एकदा कर्नाटकमधील नेता; खरगेंच्या जागेवर एच. के. पाटील यांची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.