उन्नाव - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षातील स्टार प्रचारक आपआपल्या उमेदवारांचा प्रचार करतांना दिसून येत आहेत. दरम्यान बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने आरती वाजपेई या रिंगणात आहेत. आज त्यांच्या प्रचारसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सममान खुर्शीद, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी हजेरी लावली व जनतेला संबोधित केले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
बिहारमध्ये वाढत असलेली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच वाढते गुन्हेगारीचे प्रमाण यावरून सलमान खुर्शीद यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपवर देखील टीका केली. भाजपला भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. त्यांना भारताला हिंदू राष्ट्र घोषीत करू द्या, मात्र या हिंदू राष्ट्रामध्ये हाथरस सारख्या गावात एका हिंदू मुलीवर अत्याचार होतो. या घटनेत तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात न देता पोलीस परस्पर रात्री तिच्यावर अत्यंस्कार करतात. निदान या राष्ट्रामध्ये हिंदू मुलीला तरी न्याय मिळेल का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.