ETV Bharat / bharat

केरळात काँग्रेस आणि भाजप एकाच मागणीसाठी आंदोलन का करतायेत?

केरळ सोने तस्करी प्रकरणी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सचिवालयासमोर आंदोलन केले असून पी.विजयन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचीही चौकशी व्हायला हवी, सर्व सत्य बाहेर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले.

विजयन
विजयन
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:21 PM IST

तिरुवनंतपूरम - केरळ सोने तस्करी प्रकरणी निलंबित आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. एम. शिवशंकर हे केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांचे माजी प्रधान सचिव होते. यावरून काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सचिवालयासमोर आंदोलन केले असून पी.विजयन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

विरोधकांनी राज्यातील विविध ठिकाणी मुख्यमंत्र्याविरोधात आंदोलन केले. तसेच विजयन यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. पोलिसांनी बॅरिकेड्स ओलांडणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेनिथला यांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच एम. शिवशंकर हे फक्त मोहरा असून तपास मुख्यमंत्री पी.विजयन यांच्यापर्यंत पोहचेल, असा दावा रमेश चेनिथला यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी -

सोने तस्करी प्रकरणात खरे गुन्हेगार हे मुख्यमंत्री आहेत. केरळच्या इतिहासात आतापर्यंत इतके वाईट सरकार सत्तेत आले नव्हते. याप्रकरणात आणखी दोन अधिकारी तपास यंत्रनेच्या संशयाखाली आहेत, असेही रमेश चेनिथला म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांचीही चौकशी व्हायला हवी, सर्व सत्य बाहेर येईल. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील आणखी दोघांचा सोने तस्करी प्रकरणात सहभाग आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

दुबईवरून विमानाद्वारे केरळात आणण्यात आलेल्या राजनैतिक सामानात 30 किलो सोने आढळून आले होते. या सोन्याची तस्करी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली करण्यात येत होती. तस्करीप्रकरणी युएई कौन्सलेट विभागाचा माजी कर्मचारी पी. एस सारीथ याला सीमा शुल्क विभागाने 5 जुलैला अटक केली होती. याप्रकरणी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. आरोपी स्वप्ना आणि संदिप नायर यांना बंगळुरुतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आयएसएस अधिकारी एम. शिवशंकर यांना निलंबित करण्यात आले होते. एम. शिवशंकर हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि केरळच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. त्यांच्यावर सोन्याची तस्करी करणाऱ्या सपना सुरेश आणि सुरेश नायर यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.