बीजिंग - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. यावर गलवान प्रदेशाचे सार्वभौमत्व नेहमीच चीनशी संबंधित आहे. भारतीय सीमा-दलाच्या सैन्याने सीमेशी संबंधित मुद्द्यांवरील प्रोटोकॉलचे उल्लंघन केले असून भारताने आपल्या सैन्यांना आवारावं, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी म्हटलं आहे.
भारताने त्यांच्या सैन्याला शिस्त लावावी. सीमा उल्लंघन आणि चिथावणीखोर कृत्य करणे थांबवावे, संवाद व चर्चेच्या माध्यमातून मतभेद सोडवावे, असे लिजियन म्हणाले. आम्ही (भारत आणि चीन) मुत्सद्दी व सैनिकी पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. ही घटना चीनच्या एलएसीवर झाली आहे. त्यामुळे याला चीन दोषी नाही. आम्हाला आणखी संघर्ष नको आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी म्हटलं आहे.