ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : विभाजनवादी शक्तींपासून दूर राहून निर्भयपणे मतदान करा, चिदंबरम यांचे मतदारांना आवाहन - काँग्रेस नेते पी. चिदंबरम

28 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान या निवडणुकांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं निर्भय होऊन मतदार करावे, असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बिडेन यांचा हवाला दिला आहे.

p. chidambaram
पी. चिदंबरम
author img

By

Published : Oct 18, 2020, 1:47 PM IST

नवी दिल्ली - 28 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच नोव्हेंबरमध्ये इतर 12 राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील होतील. दरम्यान या निवडणुकांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने निर्भय होऊन मतदार करावे, असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मतदारांना केले आहे.

त्यासाठी चिदंबरम यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बिडेन यांचा हवाला दिला आहे. बिडेन यांनी शनिवारी म्हटले होते की, आम्ही भीती, विभाजनवाद यांच्यापेक्षा सत्य, निर्भयता आणि एकता यावर विश्वास ठेवतो. याच प्रमाणे येथील जनतेला आणि लोकप्रतिनिधींना देखील याच मुल्यांवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. दरम्यान न्युझीलंडचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा जॅकिंडा आर्डन यांची निवड झाली आहे. चिदंबरम यांनी आर्डन यांचे अभिनंदन केले आहे. आर्डन यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नियुक्ती होने ही खरोखर चांगली गोष्ट असून, त्याच्यामुळे समाजात सभ्यता, चांगली मुल्य आणि लोकशाही टिकून असल्याची खात्री पटते, असं त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.