ETV Bharat / bharat

चांद्रयान-२ : ऑर्बिटर सुस्थितीत, विक्रमशी मात्र संपर्क नाही - इस्रो प्रमुख - गगनयान

चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सुस्थितीत असून आपले काम व्यवस्थीतपणे करत आहे. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क साधता आला नसल्याचे के. सिवन यांनी आज स्पष्ट केले.  तसेच भारताच्या पुढील अवकाश योजनांचीही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

चांद्रयान-२
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:44 PM IST

Updated : Sep 26, 2019, 6:31 PM IST

अहमदाबाद - चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सुस्थितीत असून आपले काम व्यवस्थीतपणे करत आहे. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क साधण्यात अजूनही यश मिळाले नाही, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवान यांनी गुरूवारी दिली. ते अहमदाबादमध्ये बोलत होते.

विक्रम लँडरमध्ये काय दोष झाला आहे? याचा अभ्यास करण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इस्रोच्या पुढील अवकाश योजनांबद्दल बोलताना सिवन यांनी सांगितले की, सध्या इस्रो लहान कृत्रीम उपग्रह (एसएसएलव्ही) अवकाशात पाठवणे, 'आदित्य-एल १' आणि 'गगनयान' या योजनांवर काम करत आहे.

डिसेंबर २०२१ पर्यंत इस्रो अवकाशात मानव पाठवणार आहे. त्याआधी २०२०च्या शेवटी आणि २०२१ च्या ऑगस्टमध्ये दोन मानवविरहीत अवकाशयान प्रक्षेपीत करण्याची योजना असल्याचे सिवन यांनी सांगितले.

हेही वाचा : मथुरेत फिल्मी थरार; भररस्त्यात पेटवली आपलीच कार..!

Intro:Body:

चांद्रयान-२ : ऑर्बिटर सुस्थितीत, मात्र विक्रम लँडरशी अजूनही संपर्क नाही - इस्रो प्रमुख

चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सुस्थीतीत असून आपले काम व्यवस्थीतपणे करत आहे, मात्र अजूनही विक्रम लँडरशी संपर्क साधता आला नसल्याचे के. सिवान यांनी आज स्पष्ट केले.  तसेच भारताच्या पुढील अवकाश योजनांचीही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अहमदाबाद - चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सुस्थीतीत असून आपले काम व्यवस्थीतपणे करत आहे. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क साधण्यात अजूनही यश मिळाले नाही. अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवान यांनी आज दिली. ते अहमदाबादमध्ये बोलत होते.

विक्रम लँडरमध्ये काय दोष झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील समीती नेमली आहे. या समीतीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

इस्रोच्या पुढील अवकाश योजनांबद्दल बोलताना, सिवन यांनी सांगितले की सध्या इस्रो लहान कृत्रीम उपग्रह (एसएसएलव्ही) अवकाशात पाठवणे, 'आदित्य-एल १' आणि 'गगनयान' या योजनांवर काम करत आहे.

डिसेंबर २०२१ पर्यंत इस्रो अवकाशात मानव पाठवणार आहे. त्याआधी २०२०च्या शेवटी आणि २०२१ च्या ऑगस्टमध्ये दोन मानवविरहीत अवकाशयाने प्रक्षेपित करण्याची योजना असल्याचे सिवान यांनी सांगितले.

Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.