अमृतसर - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत- पाक सीमेवरून सहा पाकिस्तानी तरुणांना अटक केली आहे. अटक केलेले सहा जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. पंजाब राज्यातील भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून त्यांना बीएसएफने ताब्यात घेतले.
सुरक्षा दलांकडून तपास सुरू -
या सहा तरुणांची सध्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे. चुकून सीमा ओलांडली की यामागे काही दुसरा हेतू होता, याचा तपास पथकाकडून घेण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नुकतेच पाकिस्तानातील एक अल्पवयीन मुलगा सीमा ओलांडून भारतात आला होता. त्याला सुरक्षा दलाने सुखरूप पाकिस्तानी प्रशासनाच्या हवाली केले. जाताना या मुलाला कपडेही देण्यात आले.