धर्मशाला (हि.प्र) - बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत जिल्ह्यातील मैक्लोडगंज येथील एका घरात सापडला आहे. आसीफ या घरात त्यांच्या एका विदेशी मैत्रिणीबरोबर किरायाने राहात होते. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कुत्र्याच्या गळ्यातील दोरीने घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ काल सकाळी आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कुत्र्याच्या गळ्यातील दोरी काढून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजले आहे.
११.३० ते १२.३० दरम्यान केली आत्हमत्या
बसरा यांनी काल ११.३० ते १२.३० च्या दरम्यान आत्महत्या केली. याबाबत एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व तपासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात बसरा यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी टाटा वैद्यकीय विद्यालयात पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी शवविच्छेदन झाल्यानंतरच त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. अशी माहिती एसपी विमुक्त रंजन यांनी दिली.
बसरा यांनी ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केले होते अभिनय
आसिफ बसरा यांनी 'वो' (१९९८), ब्लॅक फ्राईडे (२००४), जब वी मेट (२००७), वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई (२०१०), कृष ३ (२०१३), हिचकी (२०१८) आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्ये अभिनय केले आहे.
हेही वाचा - 'जनतेने आम्हाला कौल दिला, मात्र, निवडणूक आयोगानं एनडीएला जिंकवलं'