बंगळुरू - कर्नाटकच्या राजधानीमधील दोन हॉटेलांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यासोबतच आणखी १४ हॉटेलांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. शहर नागरी संस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १६३ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील विलगीकरण कक्षांची आणि कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. यासंदर्भात आम्ही आतापर्यंत १६ हॉटेलांना सूचना दिल्या असून, त्यामधील दोन हॉटेलांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर करण्यात आले असल्याची माहिती बंगळुरू महापालिका प्रशासनाने दिली आहे.
यासंदर्भात विचारणा केलेल्या हॉटेलांमध्ये शहरांमध्ये इमिरेट्स हॉटेल, एम्पायर हॉटेल, अराफान इन, हॉटेल सियाटेल, ओयो टाऊन आणि ट्रिनिटी वूड अशा काही प्रसिद्ध हॉटेलांचा समावेश आहे. यांपैकी बहुतांश हॉटेलांनी मात्र अद्याप यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा : लॉकडाऊनमुळे वैताग आलाय..? मग 'हे' करा अन् संचारबंदीची मजा घ्या