कोलकाता - फेसबूक पोस्टद्वारे ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका करताना लिहिले आहे, की भाजपचे नेते हिंदू धर्माचे वाक्य जय श्रीरामचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत. काही भाजप समर्थक खोटी माध्यमे, खोटे व्हिडिओ, खोट्या बातम्या, चुकीची माहिती याद्वारे द्वेषाचे भावना पसरवत आहेत. ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असून खरी माहिती लपवत आहेत.
राम मनोहर रॉय ते विद्यासागर ते महान सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे बंगालला महान वारसा लाभला आहे. प्रगती आणि पुरोगामी विचारधारा असणाऱ्या बंगालला भाजप चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक दृष्टीने मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
मला कोणत्याही पक्षाच्या घोषवाक्याबद्दल तक्रार नाही. प्रत्येक पक्षाचे स्वत:चे घोषवाक्य आहे. माझ्या पक्षाचे जय हिंद, वंदे वातरम असे आहे. डाव्याचे इंकलाब जिंदाबाद असे आहे. इतरांचे वेगवेगळे घोषवाक्य आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. जय सिया राम, जय राम जी की, राम नाम सत्य है ही धर्माशी निगडीत असलेली घोषवाक्य आहेत. याचाही आम्ही आदर करतो. परंतु, भाजप भाजप जय श्रीरामचा वापर राजकारणासाठी चुकीच्या पद्धतीने करत आहे. आरएसएसच्या नावाखाली भाजपचा हा प्रकार आम्ही याचा कदापिही स्वीकार करणार नाही. एकजण काहीवेळा काहीजणांना फसवू शकतो परंतु, तो सर्वांना फसवू शकत नाही, असेही ममतांनी भाजपवर टीका करताना लिहिले आहे.