ETV Bharat / bharat

Bihar Election Victory Celebration : नितीश कुमारच राहणार बिहारचे मुख्यमंत्री, मोदींचे संकेत - bjp celebration in delhi

modi
मोदी
author img

By

Published : Nov 11, 2020, 7:35 PM IST

Updated : Nov 11, 2020, 8:47 PM IST

20:10 November 11

-नितीश कुमारांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करू - मोदी

नवी दिल्ली -  बिहारमधील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी बिहारमधील मतदारांसोबतच देशवासियांचे आभार मानले आहेत. बिहार सर्वात खास आहे. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास हेच बिहार विजयाचे रहस्य आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास करू, असे म्हणत मोदींनी मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.  

धन्यवाद बिहार कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी बिहारसह देशातील जनतेचे आभार व्यक्त केले. मोदींनी म्हटले, की देशचा विकास, राज्याचा विकास हेच लक्ष्य आहे व येणाऱ्या निवडणुकांतही हाच मुद्दा राहणार आहे. हे ज्या लोकांना समजले नाही, त्यांची यावेळीही डिपॉझिट जप्त झाली.  

पीएम मोदींनी म्हटले, की २१ व्या शतकाच्या भारतीय नागरिक वेळोवेळी आपला स्पष्ट संकेत देत आहेत. आता सेवेची संधी त्यालाच मिळेल जे देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून जनतेला हीच अपेक्षा आहे.  

गरीब महिला व शेतकऱ्यांचा भाजपवर विश्वास -

मोदींनी म्हटले, की बिहार निवडणुकीसाठी भाजप व एनडीएला मोठा जनाधार मिळाला आहे. यासाठी मोदींनी भाजपा, एनडीएच्या लाखों कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जनता, निवडणूक आयोग, सुरक्षा दल, स्थानिक प्रशासन अभिनंदनास पात्र आहेत. पंतप्रधान म्हणाले, की कोरोनाच्या या संकट काळात निवडणुका घेणे सोपे काम नव्हते. परंतु आपली लोकशाही व्यवस्था इतकी सशक्त आणि पारदर्शी आहे, की या संकट काळातही विधानसभा निवडणुका घेऊन भारताच्या ताकदीची ओळख करून दिली आहे. देशातील युवक, महिला, गरीब, शेतकरी, मध्यम वर्गाचा भाजपला विश्वास आहे.  

दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांना तुफान गर्दी केली. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित आहेत. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे.

मोदी म्हणाले, लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. आधी बिहारमध्ये निवडणूक झाली की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत असत. पण आता मतदान किती वाढलं अशा बातम्या येतात. एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही देशाची ताकद आहे.  

20:09 November 11

- फॅमिली पार्ट्यांचे जाळे देशासाठी घातक - मोदी

काश्मीर ते कन्याकुमारी देशात फॅमिली पार्ट्या, राष्ट्रीय स्तरावरील पार्टीही एका कुटुंबाच्या जाळ्यात

20:09 November 11

- नितीश कुमारच राहणार बिहारचे मुख्यमंत्री, मोदींचे संकेत

20:02 November 11

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'

  • The secret to winning Bihar elections is 'Sabka saath, sabka vikas, sabka vishwaas'. It is a victory of the development works in Bihar: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/ZjpecSPjac

    — ANI (@ANI) November 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे बिहार निवडणुका जिंकण्याचे रहस्य आहे. बिहारमधील विकासकामांचा हा विजय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

19:54 November 11

देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी

  • Everyone is asking how did this happen? We can find an answer in yesterday's results. The people of India are repeatedly making it clear that the chance to serve the country will be given to those who work sincerely towards the country's development: PM Modi at BJP HQ in Delhi pic.twitter.com/mn2ecgmhgp

प्रत्येकजण विचारत आहे की हे कसे घडले? कालच्या निकालामध्ये तुम्हाला याचे उत्तर सापडेल. जे लोक देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करतात त्यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली जाईल, हे भारतीय जनता वारंवार स्पष्ट करीत आहे.

19:54 November 11

फेर-मतदान नाही आणि शांततेत मतदान बिहार निवडणुकीचे वैशिष्ट्ये -

फेर-मतदान नाही आणि शांततेत मतदान बिहार निवडणुकीचे वैशिष्ट्ये आधी बूथ हस्तगत करण्याच्या बातम्या येत असत 

19:43 November 11

रालोआच्या सर्व कार्यकर्त्यांचे व भाजपाध्यक्ष नड्डा यांचे अभिनंदन -मोदी

  • I congratulate every worker of NDA as well as their families for the success of their dedicated work and contribution in the elections. I want to congratulate BJP President JP Nadda ji for the victory in the polls: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/QJF4ywHpm2

एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे तसेच त्यांच्या कुटुंबाच्या समर्पित कार्याबद्दल आणि निवडणुकीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. बिहार विजयाबद्दल मला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे अभिनंदन करायचे आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

19:37 November 11

देशातील जनतेचे आभार केवळ भाजप विजयी झाला म्हणून नव्हे तर या लोकशाहीच्या उत्सवात सामील झाल्याबद्दल

  • I want to thank the people of the country, not because they made BJP win the polls across the states, but also because all of us enthusiastically participated in the festival of democracy: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/UVp6Paudv3

आधी बिहारमधून मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या बातम्या यायच्या, आता भाजपच्या आघाडीच्या व पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदान टक्केवारी वाढल्याच्या बातम्या येतात

19:33 November 11

मोदींकडून मतदारांचे आभार

19:22 November 11

मोदींसह भाजपचे अनेक दिग्गज नेते पक्ष मुख्यालयात दाखल

नवी दिल्ली - बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट व विरोधाचे कडवे आव्हान पार करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वात रालोआने बिहारमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामुळे उल्हासित  भाजप नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात जल्लोष करत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितिन गडकरींसह अन्य भाजपा नेते मुख्यालयात दाखल झाले आहेत. 

Last Updated : Nov 11, 2020, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.