ETV Bharat / bharat

बिहारची सत्ता कोणाकडे? आज होणार फैसला...

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या ३,७३३ उमेदवारांपैकी कोणाच्या नशीबात 'खुर्ची' आली आहे, हे आज स्पष्ट होईल...

Bihar Assembly Election Results to be declared today
बिहारची सत्ता कोणाकडे? आज होणार फैसला...
author img

By

Published : Nov 10, 2020, 6:01 AM IST

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी उभ्या असणाऱ्या ३,७३३ उमेदवारांपैकी कोणाच्या नशीबात 'खुर्ची' आली आहे, हे आज स्पष्ट होईल. तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. मोदी-राहुल यांच्या सभा, चिराग पासवान यांचे एनडीएतून बाहेर पडणे, तसेच नितीश कुमारांची ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद अशा विविध घटनांमुळे ही निवडणुक अत्यंत रंजक ठरली.

एक्झिट पोल्स महागठबंधनकडून..

तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात झाली. यांपैकी बहुतांश पोल्सनी बिहारी जनता नितीश कुमारना धक्का देऊन महागठबंधनला सत्ता देणार असल्याचे भाकित केले आहे.

एबीपी-सीवोटर एक्झिट पोलनुसार नितीशकुमार यांच्या युतीला 104 ते 128 तर लालू आघाडीला 108 ते 131 जागा मिळू शकतात, चिराग पासवान यांना 1 ते 3 आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळतील.

टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार एनडीएला 116, तर महागठबंधनला 120 जागा मिळतील. तर लोजपाला 1 आणि इतर पक्षांना 6 जागा मिळतील.

मोदी-राहुल सभा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघेही यावेळी प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. पंतप्रधानांनी बिहारमध्ये १२ सभांना संबोधित केले, तर राहुल गांधींनी सहा प्रचारसभांना संबोधित केले. यामधील कोणाच्या सभेचा किती परिणाम झाला ते आज दिसेलच..

मतदानाची टक्केवारी..

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात 71 विधानसभा जागांसाठी 53.53% टक्के मतदान झाले. तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला पार पडला. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 53.51 मतदान झाले. तर शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 56.12% मतदानाची नोंद झाली.

शिवसेनेची उडी..

बिहार निवडणुकापूर्वी राज्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात तुलना करून महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून ते प्रकरण काढून घेत त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेने थेट बिहारच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे केले. सेनेने आपले एकूण २३ उमेदवार बिहारमध्ये उभे केले होते. आता हे उमेदवार बिहारमध्ये शिवसेनेला कितपत यश मिळवून देतील हे आज स्पष्ट होईल.

'ही माझी अंतिम निवडणूक'; नितीश यांची भावनिक साद..

निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारी जनतेला भावनिक साद घातली होती. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असे भावनिक आवाहन नितीश यांनी केले . ते पूर्णिया येथील जाहीर सभेला संबोधित करत होते.

दरम्यान, यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत एनडीएने पराभव पत्करला असल्याचे म्हटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीशकुमार यांनी ज्या प्रकारे विधान केले. त्यावरून बिहारमधील भाजपा-जेडीयू आघाडीने पराभव स्वीकारला हे स्पष्ट झाले. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत, की बिहारमधील जनतेला बदल हवा आहे. बिहारमध्ये एक महायुती सरकार स्थापन होईल, हे त्यांनी निश्चितपणे स्वीकारले आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले.

भाजपचे कोरोनास्त्र..

भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये बिहारमधील जनतेला चक्क कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं तर खरं. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपने काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी यावरुन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

निकालास होणार उशीर..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी करण्यासाठी एका कार्यालयात केवळ सात टेबल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका टेबलवर केवळ एक कर्मचारी बसेल. यामुळे मतांच्या मोजणीसाठी लागणारा कालावधी वाढणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 'भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली' राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.