कोलकाता - पश्चिम बंगालमधील नॉर्थ परगणा येथील भाटपाडातील नवीन पोलीस ठाण्याच्या उद्घाटनापूर्वी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण ठार झाले आहेत. तर, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाटपाडा येथे नवीन बांधलेल्या पोलीस ठाण्याचे उद्धाटन होते. परंतु, काही तासांपूर्वी जमावाने ठाण्यावर जोरदार बॉम्बफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. तरीही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. त्यामुळे, पोलिसांनी हवेत गोळीबार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
बॉम्बफेकीत संत साव आमि रामबाबू साव या हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर जखमी झाले.