ETV Bharat / bharat

बैतूलमधील सामूहिक अत्याचारीत पीडितेचे आत्मदहन, नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू - बैतुल सामुहिक अत्याचार प्रकरणी

देवगाव येथील एका १४ वर्षीय मुलीवर गावातीलच तीन नराधमांनी दीड महिन्यापूर्वी सामूहिक अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता न करण्याबाबत धमकावले. या घटनेनंतर ते तीनही नराधम तिला सतत त्रास द्यायचे, तिला दररोज याबाबत कुठेही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने काल (मंगळवार) संध्याकाळी रॉकेल ओतून स्वत:ला आग लावून घेतली. या घटनेत ती ९० टक्के भाजली गेली, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नागपुरात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बैतूलमधील सामुहिक अत्याचार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

author img

By

Published : Feb 26, 2020, 11:45 AM IST

भोपाळ - मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीने नराधमांच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित मुलगी ९० टक्के भाजली होती, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. पीडित मुलगी ही ८ व्या वर्गात शिकत होती, तिच्यावर दीड महिन्यांपूर्वी तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. संदीप, अजय, नितेश असे नराधमांची नावे आहेत.

बैतूलमधील सामुहिक अत्याचार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

माहितीनुसार, देवगाव येथील एका १४ वर्षीय मुलीवर गावातीलच तीन नराधमांनी दीड महिन्यापूर्वी सामूहिक अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता न करण्याबाबत धमकावले. या घटनेनंतर ते तीनही नराधम तिला सतत त्रास द्यायचे, तिला दररोज याबाबत कुठेही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने काल (मंगळवार) संध्याकाळी रॉकेल ओतून स्वत:ला आग लावून घेतली. या घटनेत ती ९० टक्के भाजली गेली, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नागपुरात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांना आढळला सुसाइड नोट -

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. यावेळी पोलिसांना तिने लिहिलेली एक सुसाइड नोटही आढळून आली. ज्यात तिने संदीप, अजय आणि अन्य एकाचे नाव लिहिली आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. तर, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.