ETV Bharat / bharat

बेळगावमध्ये 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात; आतापर्यंतच्या चाचण्या यशस्वी - Karnataka Covaxin trials

या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस ४ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. आता या टप्प्यामध्ये ७८० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ही लस दिलेल्या कोणावरही कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत.

Belagavi hospital starts phase 3 trials successfully
बेळगावमध्ये 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात; आतापर्यंतच्या चाचण्या यशस्वी
author img

By

Published : Dec 20, 2020, 11:00 AM IST

Updated : Dec 20, 2020, 12:10 PM IST

बंगळुरू : कर्नाटकच्या बेळगावमध्ये कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारत बायोटेकने बनवलेली ही पूर्णपणे स्वदेशी कोरोना लस आहे. यापूर्वीच्या दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.

७८० जणांना देण्यात येणार लस..

या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस ४ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. आता या टप्प्यामध्ये ७८० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ही लस देण्यात आलेल्या कोणावरही कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणही येत्या चार-पाच दिवसांमध्ये पार पडेल. देशभरातील १२ रुग्णालांमध्ये या चाचण्या सुरू आहेत. कर्नाटकमध्ये बेळगाव येथील जीवन रेखा रुग्णालयात या चाचण्या सुरू आहेत.

दुष्परिणामांबाबत अफवा..

काही लोक अशा अफवा पसरवत आहेत, की ही लस घेतल्यानंतर लोकांना दुष्परिणाम दिसून आले. मात्र तसे काहीही झाले नसून, ही लस घेणाऱ्या कोणत्याही स्वयंसेवकावर कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळून आले नाहीत. केवळ कर्नाटकातील नाही, तर देशातील १२ चाचणी केंद्रांमध्येदेखील कोणत्याही स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. यामध्ये आम्ही सध्या दिवसाला सुमारे ८० स्वयंसेवकांना ही लस देत आहोत, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमित भाटे यांनी दिली.

हेही वाचा : केरळमध्ये शिगेल्ला जंतूचा कहर; २० बाधित तर एकाचा मृत्यू..

Last Updated : Dec 20, 2020, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.