प्रत्येक युद्धात सर्वप्रथम सत्याची शिकार होते आणि दुसरी शिकार होते ती महिलांची, युद्धाने उध्वस्त झालेल्या सीरिया, इराक, येमेन आणि अफगाणिस्तानच्या महिला याचे प्रतिक आहेत.
प्रमुख राजकीय तत्वज्ञानाच्या कोसळलेल्या अवशेषांच्या ढिगाऱयाखाली त्यांच्या दैन्यावस्थेची मूक कहाणी गाडली गेली आहे. तरीही काही महिला धार्मिक आणि राजकीय उपदेशासाठी असलेली स्वतःची असुरक्षितता ओळखतात आणि सुरक्षा आणि स्वातंत्र्याकडे स्वतःचा मार्ग शोधून जातात.
एकेकाळी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानच्या भागांमध्येही हे स्पष्टपणे दिसते. काही प्रांत वगळता, संपूर्ण अफगाणिस्तानात, विशेषतः पाकिस्तानला लागून असलेल्या प्रांतांमध्ये महिलांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध जगण्याची आदिम शैली स्विकारल्याचे पहायला मिळते. मध्य पूर्व देशांमध्येही हीच परिस्थिती होती. या प्रदेशांतील महिलांना पुरूष जे स्वातंत्र्य आणि अधिकार भोगतात, तशी समान संधी देणारी संस्कृती स्विकारायला आवडेल परंतु लोकप्रिय राजवटींनी त्यांना मुक्त जीवनशैली कधीच मान्य केली नाही.
बहुसंख्य महिलांना, अज्ञानातून, असे वाटत असते की, त्यांची जी जीवन जगण्याची पद्घती आहे ती श्रद्धेचा भाग आहे. आपल्यासाठी जे हक्क आहेत. ते इस्लामी न्यायशास्त्रानुसार असमान असून वेगळ्या शरीरशास्त्रानुसार आहेत. हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र, या हास्यास्पद विश्वासाचा स्विकार त्यांच्यासाठी श्रद्घा बनली आहे आणि यातच महिला अनेक दशके आणि शतकांपासून रहात आल्या आहेत.
पुरूषांना आपली जोडीदार निवडण्याची परवानगी होती आणि महिलांना पितृसत्ताक कुटुंब पद्धतीकडून मंजुरी मिळवावी लागत असे. पुरूष आपल्या भावना व्यक्त करत, महिलांना आपल्या भावना आतल्याआत ठेवाव्या लागत. पापाच्या व्याख्येलासुद्घा अनेक आयाम आणि अर्थ होते. पुरूषांकडून पाप झाले तर, वेगळी किमत चुकवावी लागत असे आणि महिलांनी ते केले तर त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असे.
गेल्या दोन दशकांत या नमुन्यात, युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील महिलांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांना आपले कुटुंब पोसण्यासाठी नोकरीची संधी क्वचितच मिळत असे. त्या सहशिक्षणासाठी शाळेतही जाऊ शकत नसत. आपले विचार बाहेर व्यक्त करण्यासाठी जो काही अवकाश त्यांना होता तो निषिद्ध होता. चेहराच नव्हे तर महिलांचा आवाजही अनोळखी व्यक्तींपासून (गैर मुहारिम) दूर ठेवावा लागत असे.
अरब जगतातील महिलांबाबतही अशीच परिस्थिती होती. अगदी आणिबाणीच्या परिस्थितीतही, महिलांना आपले कुटुंब बाहेर काढून न्यायची परवानगी नसे. या वंचित अवस्थेतून क्रांति अटळच होती आणि परिवर्तन घडायलाच हवे होते.
आधुनिक साहित्यातील व्यक्तिवादाची कल्पना आणि सांस्कृतिक इस्लामच्या आधुनिक अर्थ लावण्यातून या क्षेत्रांत अनेक दशकांपासून महिलांना ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडण्यास मदत झाली. त्यांच्या दैन्यावस्थेला काही अंशी पितृसत्ताक जबरदस्तीच्या पद्घती जबाबदार होत्या तसेच काही प्रमाणात त्यांचा स्वतःचा विरोध न करण्याचा पवित्राही कारण होता.
माहितीचा संकुचित आणि मर्यादित ओघ मोठ्या प्रमाणात परिवर्तनाला अटकाव करणारा ठरला. युद्धामुळे विरोधाभास असा झाला की, लोकसंख्येचे स्थलांतर झाले आणि त्यामुळे सनातनी जीवनपद्घतीकडून नव्या भागांमधील नव्या जीवनशैलीकडे वळावे लागले. तरीसुद्घा, काही लोकांनी स्थलांतर करण्याचा पर्याय स्विकारला नाही आणि त्यांच्या स्वतःच्या मायभूमीतच परिवर्तन आणताना, बदलाला विरोध करणाऱया सर्व शक्तींना आव्हान दिले.
मायना हबीब ही अशा महिलांपैकी एक असून तालिबानच्या राजवटीत, तिने काबूल सोडायचे नाही, असा निर्णय घेतला. तसेच आपल्याला हवी तशी जीवनशैली स्विकारून जगायचे ठरवले. मायना, एक ताजिक महिला असून काबूलच्या अत्यंत दुर्गम, अस्वच्छ आणि धूळभरल्या गावाची रहिवासी आहे. दडपशाही आणि दमनतंत्राच्या बेड्यांतून मुक्त होण्याचे तिने ठरवले. ती अत्यंत गरिब वातावरणातून आली आहे. पण तिचा पोषाख आणि राहणी तसे अजिबात दिसू देत नाही.
पुरूषांबरोबर तालिबानच्या राजवटीत सार्वजनिक क्षेत्रात काम करणे म्हणजे मृत्युला उघड निमंत्रण होते. आपले शिक्षण संपवल्यावर तिने वृत्तमासिकात नोकरी धरली आणि दूरचित्रवाणीवर एक कार्यक्रमही सादर करायला सुरूवात केली. त्यामुळे अत्यंत ऐटबाज दिसण्यासाठी तिच्याकडे हे पुरेसे कारण होते.
ज्या देशात, बहुतेक महिला आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ बुरख्यात व्यतीत करतात, हबीबीने चेहऱयाला मेकअप केला, जीन्स आणि टॉप परिधान करत धाडसीपणाचे प्रतिक सादर केले. तिने आपले केसही रंगवले, जे अफगाणिस्तानच्या बहुतेक भागात तालिबानचे राज्य असताना अतिशय धाडसी कृत्य होते.
मुख्य काबूल शहरात आपल्य कार्यालयात जाण्यासाठी ती सकाळी ७ वाजता घर सोडायची. हबीबी ही अफगाणिस्तानचे राजकीय भाग्य मुजाहिदीनपासून ते तालिबान ते सध्याचे अमेरिकन पुरस्कृत अशरफ गनी राजवटीपर्यंत कसे बदलत गेले, याची साक्षीदार आहे.
सध्याच्या सरकारबद्दल ती समाधानी असली तरीही, त्यांच्या कोणत्याही नेत्यामुळे ती अजिबात प्रभावित झालेली नाही. तिला आपली आई वगळता कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याकडून पाठिंबा मिळालेला नाही आणि तोही छुपेपणाने मिळाला आहे. तिच्या वडलांना तिचे काम किंवा तिचे पुरूष सहकार्यांमध्ये मिसळणेही कधीच आवडले नाही. त्यामुळेच तिने घरापासून दूर राहणेच पसंत केले आहे. काबूल शहरात एका अपार्टमेंटमध्ये ती कुटुंबाच्या कोणत्याही सहकार्याशिवाय राहत आहे.
हबीबी जेव्हा विद्यार्थिनी होती, तेव्हा महिलांना बुरख्याशिवाय स्विकारण्यास तयार नसलेल्या समाजाचा रोष टाळण्यासाठी अगदी दुःखाने ती बुरखा परिधान करायची. हबीबीप्रमाणेच, अनेक पश्तु मुली, काबूलच्या काही भागांत नव्याने मिळालेले स्वातंत्र्याचा आनंद लुटत आहेत, असे दिसते.
काबूल विद्यापीठातील मानसशास्त्र विषयाच्या तिसऱया वर्षाच्या विद्यार्थिनीने विविध राजवटी पाहिल्या असून आता जो काही बदल दिसतो आहे तो कायम रहावा, असे त्यांना वाटते. तसेच हाच बदल ग्रामीण भागातही राहणाऱ्या महिलांना चांगले जगता यावे, म्हणून पसरावा, असेही त्यांना वाटते.
वस्तुस्थिती ही आहे की, प्रत्येक मानवी मनाला कशाची तरी उत्कट इच्छा असते. त्यामुळे लिंगभेदाच्या सीमा किंवा एखाद्याच्या इच्छा पूर्ण नाकारणारी आणि मान्य न करणारी व्यवस्था या कशालाही न जुमानणाऱया भावनांची सत्यता स्विकारणे समाजाला अनिवार्य असले पाहिजे. जर नियंत्रण करायला हवे असले तर ते पडद्याआडच्या आणि उघडपणे वावरणाऱ्या अशा दोघांसाठीही हवे. लिंगभेदाच्या आधारावर पक्षपात केला जाऊ नये आणि जीवन आणि जीवनशैली लिंगभेदावर ठरवली जाऊ नये.
लेखक - बिलाल भट