ETV Bharat / bharat

बालाकोट स्ट्राइकचे रणनीतिकार सामंत गोयल ‘RAW’ चे नवे चीफ, अरविंद कुमार 'IB'चे संचालक - arvind kumar

बालाकोट हवाई स्ट्राइकनंतर ३ महिन्यांत तीन महिन्यात गोयल यांची संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 'रॉ'मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.

सामंत गोयल
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:19 PM IST

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने आज बालाकोट हवाई हल्ल्याच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक सामंत गोयल यांना भारताच्या 'रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग' (RAW) च्या प्रमुखपदी नियुक्त केले. तर, १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांना इंटलिजन्स ब्युरोच्या (IB) संचालकपदी नियुक्त करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

samant goel
नियुक्ती पत्र
सध्याचे आयबी संचालक राजीव जैन आणि 'रॉ'चे प्रमुख अनिल धस्माना हे २९ जूनला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी अनुक्रमे कुमार आणि गोयल हे दोघे ३० तारखेपासून पदभार स्वीकरतील. गोयल आणि कुमार हे दोघे १९८४ च्या अनुक्रमे पंजाब कॅडरचे तर, कुमार हे आसाम कॅडरचे अधिकारी आहेत. ९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद फोफावला होता. गोयल यांनी हा दहशतवाद संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा सेवा बजावली आहे. अडीच वर्षाच्या शानदार सेवेनंतर धस्माना निवृत्त होत आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. तसेच, त्याआधी सर्जिकल स्ट्राईकही केला होता. या दोहोंमध्ये गोयल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्ट्राइकनंतर ३ महिन्यांत तीन महिन्यात गोयल यांची संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 'रॉ'मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.

Intro:Body:

बालाकोट स्ट्राइकचे रणनीतिकार सामंत गोयल ‘RAW’ चे नवे चीफ, अरविंद कुमार 'IB'चे संचालक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने आज बालाकोट हवाई हल्ल्याच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक सामंत गोयल यांना भारताच्या 'रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग' (RAW) च्या प्रमुखपदी नियुक्त केले. तर, १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांना इंटलिजन्स ब्युरोच्या (IB) संचालकपदी नियुक्त करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

सध्याचे आयबी संचालक राजीव जैन आणि 'रॉ'चे प्रमुख अनिल धस्माना हे २९ जूनला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी अनुक्रमे कुमार आणि गोयल हे दोघे ३० तारखेपासून पदभार स्वीकरतील. गोयल आणि कुमार हे दोघे १९८४ च्या अनुक्रमे पंजाब कॅडरचे तर, कुमार हे आसाम कॅडरचे अधिकारी आहेत. ९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद फोफावला होता. गोयल यांनी हा दहशतवाद संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा सेवा बजावली आहे. अडीच वर्षाच्या शानदार सेवेनंतर धस्माना निवृत्त होत आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. तसेच, त्याआधी सर्जिकल स्ट्राईकही केला होता. या दोहोंमध्ये गोयल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्ट्राइकनंतर ३ महिन्यांत तीन महिन्यात गोयल यांची संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 'रॉ'मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.