ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज (16 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे. वाजपेयी आज शरीराने या जगात नाहीत. मात्र, ग्वाल्हेरच्या या सुपुत्राच्या आठवणी ग्वाल्हेरवासियांच्या हृदयात आजही जीवनात आहेत. वाजपेयी यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बटेश्वर गावात झाला. मात्र, त्याचे बालपण ग्वाल्हेरच्या कमल सिंह बागेत गेले. येथूनच त्यांनी प्राथमिक आणि पदवीचे शिक्षण घेतले. एक चांगला कवी आणि राजकारण या दोन्हीं गोष्टीतील अतिशय छोट्या-छोट्या संकल्पना त्यांनी येथूनच शिकल्या. ग्वाल्हेरमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी जुळल्या आहेत. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टींवर प्रकाश टाकला.
वाजपेयींचे आवडते लाडू -
वाजपेयींना खाण्याचे शौकीन होते. ते स्वत:ही खायचे आणि दुसऱ्यांना आवडीने खाऊ घालायचे. ग्वाल्हेरमध्ये काही जागा आहेत, ज्याठिकाणी त्यांचे नेहमी जाणे व्हायचे. त्यातीलच एका दुकान म्हणजे बहादुरा स्वीट्स. नवीन बाजार परिसरात असलेले बहादुरा स्वीट्स दुकानातील लड्डू आणि रसगुल्ले वाजपेयींना खूप आवडायचे. इतकेच नाही तर पंतप्रधान बनल्यावर त्यांचे ग्वाल्हेरला येणे कमी झाले होते. यामुळे त्यांच्यासाठी विशेष पद्धतीने बहादुरा स्वीट्सचे लाडू आणि रसगुल्ले दिल्लीला पाठवले जात होते.
याबाबत बहादुरा दुकानाचे संचालक आणि येथे येणाऱ्या लोक गौरव अनुभव करतात. यानिमित्ताने वाजपेयींच्या आठवणींना उजाळा मिळतो. या दुकानात लाडू खरेदीसाठी आलेल्या मुंबईतील लोकांचे म्हणणे आहे की, येथे जात असताना विचार आला की येथील लाडू नक्की खायला हवा कारण या दुकानाशी देशाचे लाडके सुपूत्र अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणी जुळल्या आहेत.
अटलजींना जितके बहादुरा लाडू आवडत होते तितकेच त्यांना 'अम्मा के मंगौडे' (मूगवडे) ही आवडत होते. विद्यार्थीदशेपासून ते राजकारणाच्या व्यासपीठापर्यंत ते प्रत्येक सायंकाळी या दुकानावर येत असत. आपल्या मित्रांसोबत ते रात्री उशिरापर्यंत या दुकानावर मुगवड्यांचा आस्वाद घ्यायचे. त्यावेळी या दुकानाचा कारभार अम्मा चालवायच्या.
दुकानाचे संचालक दुर्गा सिंह सांगतात की, त्यांनी आपल्या लहानपणापासून अटलजींना याठिकाणी येताना पाहिले आहे. पंतप्रधान बनल्यावर त्यांचे अनेक मित्र त्यांच्यासाठी दिल्लीला मूगवडे आणि भजी घेऊन जायचे.
ग्वाल्हेरमध्ये घेतले प्राथमिक शिक्षण -
ग्वाल्हेरमधील गोरखी शाळेत त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. विशेष म्हणजे, अटलजी ज्यावेळी 1935-37 कालावधी याठिकाणी शिक्षण घेत होते त्याचवेळी त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी या शाळेत शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य करत होते. अटलजींचा हजेरी क्रमांक 101 होता. शाळेत आजही अटलजींची हजेरी असलेले रजिस्टर जतन करुन ठेवण्यात आले आहेत. या शाळेशी अटलजींच्या आठवणी जुळलेल्या आहेत.
अटल मंदिर होते दिवस रात्र पूजा -
अटल बिहारी वाजपेयी आज या जगात नाहीत. मात्र, ग्वाल्हेरवासियांसाठी ते आजही जिवंत आहेत. याचकारणाच्या निमित्ताने ग्वाल्हेरवासियांनी अटलजींचे मंदिर उभारले आहे. मंदिरात अटलजींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. तसेच नित्यनेमाने सकाळी-संध्याकाळी त्यांच्या कविता आरती स्वरुपात म्हटल्या जातात. या मंदिरात एक पुजारी आहेत, जे सकाळी संध्याकाळ पूजा-अर्चना करतात.