वाराणसी - काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारवर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होते आहे. राजकीय, सामाजिक, फिल्म क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काशीमधील कलाकारांनीही खास गीत लिहून केंद्र सरकारचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गोडवे गायले आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा केला, तर कुठे ढोल-ताशे वाजवत या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच काशीमधील कलाकारांनी खास गाणे तयार करत या निर्णयाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. वाराणसीमधील अस्सी घाट येथे या कलाकारांनी हे गाणे तयार केले. आम्ही या गाण्याच्यामाध्यामातून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे.
आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यामुळे आम्ही हे गाणे तयार करत देशातीलच नव्हे तर परदेशातील भारतीयांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला असल्याची माहिती गायक डॉ. अमलेश शुक्ला यांनी दिली.