ETV Bharat / bharat

'विझाग'मधील वायुगळतीची घटना दुःखद, बारकाईने छाननी सुरू - अमित शाह

author img

By

Published : May 7, 2020, 1:40 PM IST

या वायुगळतीमुळे एका लहान मुलासह सहा जणांना जीव गमवावा लागला. तर, शंभरहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ही बाब दुःखद असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तसेच सरकार या घटनेची बारकाईने माहिती घेत असल्याचे शाह म्हणाले.

अमित शाह
अमित शाह

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील 'विझाग' रासायनिक प्रकल्पात झालेली वायुगळतीची घटना गंभीर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. या वायुगळतीमुळे एका लहान मुलासह सहा जणांना जीव गमवावा लागला. तर, शंभरहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ही बाब दुःखद असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तसेच सरकार या घटनेची बारकाईने माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.

'विझाग येथे झालेल्या वायुगळती विषयी मी एनडीएमए अधिकाऱ्यांशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी ही संपर्क साधला आहे. आम्ही या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व घटनेची बारकाईने छाननी करत आहोत. या विषयी अधिक माहिती घेतली जात आहे,' असे ट्विट शाह यांनी केले आहे.

  • The incident in Vizag is disturbing.

    Have spoken to the NDMA officials and concerned authorities. We are continuously and closely monitoring the situation.

    I pray for the well-being of the people of Visakhapatnam.

    — Amit Shah (@AmitShah) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशी संपर्क साधून या घटनेविषयी माहिती घेतल्याचे सांगितले. रेड्डी यांनी एनडीआरएफच्या (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) पथकांना या घटनेतील पीडितांना आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'मी येथील परिस्थितीकडे सतत लक्ष ठेवून आहे. या घटनेचा शेकडो लोकांना फटका बसला आहे. विशाखापट्टणम येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे,' असे शाह म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.