अलाप्पुझा - भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू ह्यांच्या प्रचलित ट्रॉफीसाठी भव्य सर्पनौका प्रतिस्पर्धा पुन्नमड तलावामध्ये पार पडतात. ह्या स्पर्धाचे आयोजन प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केले जाते. यावर्षी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले असून या कार्यक्रमात माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.
राज्याचे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांच्या हस्ते चॅम्पियन्स बोट लीगचे उद्घाटन झाले. 67 व्या नेहरू ट्रॉफी नौका शर्यतीत चॅम्पियन्स बोट लीगची सुरुवात झाली. नेहरू ट्रॉफी नौका शर्यतीत शर्यतीची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा विविध प्रकारच्या बोटींची असते. या स्पर्धेमध्ये 23 सर्पनौकासह 79 इतर नौका देखील सहभागी झाल्या आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू ह्यांनी प्रचलित केलेल्या ट्रॉफीसाठी भव्य सर्पनौका प्रतिस्पर्धा करतात. चन्दनवल्लम (स्नेकबोट) आणि छोट्या देशी नौकांची स्पर्धा व्यतिरीक्त या समारोहात धार्मिक जल मिरवणूक, शानदार फ्लोट्स (शोभायान) आणि सुसज्जित नौकांची मनमोहक दृश्ये पहायला मिळतात.