नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तेच्या पेचाबाबत पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपले मौन सोडले आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्वांना पुरेसा वेळ दिला गेला होता. आमच्यासह शिवसेना किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात असमर्थ ठरली. याआधी कोणत्याही राज्याला सरकार स्थापनेसाठी १८ दिवसांइतकी मुदत दिली गेली नव्हती. त्यामुळे, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
-
No one objected when we said Devendra Fadnavis will be Maharashtra CM if alliance wins: BJP President Amit Shah
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/yqwVX3RmD3 pic.twitter.com/XIRQ0Lz3dD
">No one objected when we said Devendra Fadnavis will be Maharashtra CM if alliance wins: BJP President Amit Shah
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2019
Read @ANI story | https://t.co/yqwVX3RmD3 pic.twitter.com/XIRQ0Lz3dDNo one objected when we said Devendra Fadnavis will be Maharashtra CM if alliance wins: BJP President Amit Shah
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2019
Read @ANI story | https://t.co/yqwVX3RmD3 pic.twitter.com/XIRQ0Lz3dD
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, की आजही महाराष्ट्रातील एखादा पक्ष आपले बहुमत सिद्ध करू शकत असेल, तर त्याने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करावा.
राष्ट्रवादीने आधीच पाठवले होते पत्र..
राज्यपालांनी राष्ट्रवादीला ८.३० पर्यंतची वेळ दिली असता, आधीच राष्ट्रपतींना पत्र कसे पाठवले यावरून बराच गदारोळ माजला होता. त्याबाबत बोलताना अमित शाह यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीने दुपारीच राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली होती. तसेच, राज्यपालांकडे अधिक वेळेचीही मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीवर अन्याय झाला असे काही नाही. कोणत्याही पक्षावर याबाबत अन्याय झाला नाही. उलट, त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. आता त्यांना सहा महिन्यांची मुदत मिळाली आहे.
शिवसेनेच्या मागण्या अमान्य..
निवडणुकांच्या आधीपासूनच राजकीय सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मीदेखील कित्येक वेळा हे स्पष्ट केले होते, की युतीचे सरकार आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी त्याबाबत कोणीही तक्रार केली नव्हती. मात्र, आता ते (शिवसेना) आपल्या नव्या मागण्या पुढे करत आहेत, ज्या आम्हाला मान्य नाहीत.
राष्ट्रपती राजवट लागल्याने भाजपचेच नुकसान..
भाजपने आपल्या फायद्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केल्याचा आरोपही केला जातो आहे. मात्र, यात सर्वात जास्त नुकसान भाजपचेच झाले आहे. कारण, आमचे काळजीवाहू सरकार बरखास्त झाले आहे. विरोधी पक्षांचे यात काहीही नुकसान नाही झाले. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेचेही यात नुकसान झाले आहे, मात्र ती आमची चूक नाही. आमच्या मित्रपक्षाने निवडणूकीनंतर वेगळ्या मागण्या केल्या, ज्या आम्हाला मान्य नव्हत्या. शिवाय फक्त भाजपकडे बहुमत नव्हते, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू शकलो नाही.
हेही पाहा : VIDEO : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर अमित शाहांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले...