ETV Bharat / bharat

'काँग्रेससाठी देशहितापेक्षा राजकारण महत्त्वाचे; त्यांनी देशाची माफी मागावी' - अमित शाह राफेल निर्णय

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या निर्णयामुळे मोदी सरकार हे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक असल्याचाच जणू पुरावा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Amit Shah on SC verdict of Rafael
author img

By

Published : Nov 14, 2019, 4:53 PM IST

नवी दिल्ली - राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी, हा निर्णय म्हणजे वायफळ मोहिमांवर अवलंबून असणाऱ्या राजकारणी आणि पक्षांना चपराक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Amit Shah: Now,it has been proved that disruption of Parliament over Rafale was a sham.The time could have been better utilised for welfare of people.After today's rebuke from SC,Congress & its leader,for whom politics is above national interest must apologise to the nation. https://t.co/jUhfUA8VdF

    — ANI (@ANI) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
फ्रेंच कंपनी 'दसॉल्ट एव्हिएशन'कडून 'राफेल' लढाऊ विमान खरेदी प्रकरणातील 2018च्या केंद्र सरकारला क्लीन चिट देण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
शाह पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे मोदी सरकार हे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक असल्याचाच जणू पुरावा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राफेलच्या मुद्यावरून संसदेमध्ये खंड पाडणे हे चुकीचे होते, हेदेखील आता सिद्ध झाले आहे. या सर्वामध्ये जो वेळ वाया गेला, तो लोक कल्याणासाठी वापरता आला असता.

काँग्रेस आणि त्यांच्या अध्यक्षांसाठी राजकारण हे नेहमीच देशहितापेक्षा जास्त महत्त्वाचे राहिले आहे. आजच्या निर्णयानंतर त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे म्हणत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही वाचा : BREAKING.. राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Intro:Body:

'काँग्रेससाठी देशहितापेक्षा राजकारण महत्त्वाचे; त्यांनी देशाची माफी मागावी'

नवी दिल्ली - राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी, हा निर्णय म्हणजे वायफळ मोहिमांवर अवलंबून असणाऱ्या राजकारणी आणि पक्षांना चपराक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

फ्रेंच कंपनी 'दसॉल्ट एव्हिएशन'कडून 'राफेल' लढाऊ विमान खरेदी प्रकरणातील 2018च्या केंद्र सरकारला क्लीन चिट देण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

शाह पुढे म्हणाले, की या निर्णयामुळे मोदी सरकार हे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक असल्याचाच जणू पुरावा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राफेलच्या मुद्यावरून संसदेमध्ये खंड पाडणे हे चुकीचे होते हेदेखील आता सिद्ध झाले आहे. या सर्वामध्ये जो वेळ वाया गेला, तो लोककल्याणासाठी वापरता आला असता.

काँग्रेस आणि त्याच्या अध्यक्षांसाठी राजकारण हे नेहमीच देशहितापेक्षा जास्त महत्त्वाचे राहिले आहे. आजच्या निर्णयानंतर त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे म्हणत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.