ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री जगनमोहन यांनी शब्द पाळला; सत्तेवर येताच आशा स्वयंसेविकांच्या पगारात सातपट वाढ - मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी

आरोग्य खात्याच्या झालेल्या बैठकीत रेड्डींना आशा स्वयंसेविकांचा पगार ३ हजारावरुन १० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. २००५ साली देशात राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत आशा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती.

आंध्रप्रदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बैठक
author img

By

Published : Jun 3, 2019, 8:51 PM IST

अमरावती - आंध्रपद्रेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी आशा स्वयंसेविकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला. आरोग्य खात्याच्या झालेल्या बैठकीत रेड्डींना आशा स्वयंसेविकांचा पगार ३ हजारावरुन १० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. २००५ साली देशात राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत आशा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती.

मुख्यमंत्री रेड्डींनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की आमची आरोग्य विभागाला पहिली प्राथमिकता राहणार आहे. मी स्वत: या विभागाचे निरिक्षण करणार आहे. आम्हाला राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा खासगी रुग्णालयांपेक्षा दर्जेदार बनवायची आहे. रेड्डींनी यावेळी 'आरोग्यश्री' योजनेचे नाव बदलून 'वायएसआर आरोग्यश्री' असे केले आहे.

रेड्डींनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा रिपोर्ट मागवून रुग्णवाहिकांबद्दलही माहिती घेतली. तसेच, त्यांनी हलक्या प्रतीची औषधे खरेदी-विक्रीवर अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यात काही गैरव्यवहार आढळल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागा का वाढल्या नाहीत, याबाबत विचारणा केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.