इस्लामाबाद - पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकतच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर पुन्हा टीका केली आहे. 'जेव्हा स्वातंत्र्यासाठी देश एकत्र येतो. त्यावेळी लक्ष्य गाठण्यापासून त्यांना कोणीच थांबवू शकत नाही, असे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे.
-
The fascist, Hindu Supremacist Modi Govt should know that while armies, militants & terrorists can be defeated by superior forces; history tells us that when a nation unites in a freedom struggle & does not fear death, no force can stop it from achieving its goal.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The fascist, Hindu Supremacist Modi Govt should know that while armies, militants & terrorists can be defeated by superior forces; history tells us that when a nation unites in a freedom struggle & does not fear death, no force can stop it from achieving its goal.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 16, 2019The fascist, Hindu Supremacist Modi Govt should know that while armies, militants & terrorists can be defeated by superior forces; history tells us that when a nation unites in a freedom struggle & does not fear death, no force can stop it from achieving its goal.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 16, 2019
भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचा अजूनही जळफळाट सुरू आहे. इम्रान खान यांनी टि्वटच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली. ' मोदी सरकारला हे समजायला हवे की, दहशतवाद्यांना शक्तीशाली सेनेच्या जोरावर पराभूत करता येते. मात्र इतिहास साक्षी आहे. जेव्हा एक देश स्वातंत्र्यासाठी एकत्र येतो. तेव्हा त्यांना मृत्यूची भिती वाटत नाही. अशावेळी लक्ष्य गाठण्यापासून त्यांना कोणीच थांबवू शकत नाही, असे टि्वट इम्रान खान यांनी केले आहे.
दरम्यान गुरुवारी पाकिस्तानमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर केला होता. या संदर्भातल्या सूचना पाकिस्तानतल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना देण्यात आल्या होत्या. तर इम्रान खान यांनी आपल्या टि्वटर खात्यावर प्रोफाईल फोटो ऐवजी काळा रंग भरला होता.