नवी दिल्ली - सप्टेंबर 1 ते 6 दरम्यान घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी 1.6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, अशी माहिती भारतीय तंत्रज्ञान संस्थेने दिली.
कोरोना काळात अत्यंत कडक खबरदारी घेत जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या 600 वरुन एक हजारांवर करण्यात आली होती. तर मागच्या वर्षी 164 शहरांत ही परीक्षा घेण्यात आली.
यावेळी परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावरील फाटकाला सॅनिटाईझ करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी मास्कचे वाटप करण्यात आले होते. सामाजिक अंतराचे भान ठेवत दोन उमेदवारांमध्ये अंतर ठेवण्यात आले होते, अशी माहिती भारतीय तंत्रज्ञान संस्थेने दिली.
हेही वाचा - 'भारतीय लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळविण्यापासून आणखी दूर'