कोटा - देशभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी शहरात कोरोनाचे 75 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोटा जिल्ह्याचा आकडा 1 हजार 564 वर पोहोचला आहे. तर काल म्हणचे बुधवारी 53 नवे रुग्ण आढळले होते. यातील बहुतेक लोक 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तसेत हे रुग्ण गंभीर आजाराने देखील ग्रस्त आहेत.
कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी 11 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात 20 ते 58 वर्षे वयोगटातील कैद्यांचा समावेश आहे. त्यामुळे कारागृहात आतापर्यंत एकूण 55 कैदी कोरोनाबाधित आढळले आहेत.
वैद्यकीय आरोग्य विभागात कोरोना संशयिताच्या नमुन्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सकारात्मक रूग्णांच्या संपर्कात येणार्या आणि लक्षणे असलेल्या रूग्णांची अधिकाधिक तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक रुग्णांची संख्या वाढत आहे. कोटामध्ये आढळलेल्या बहुतेक पॉझिटिव्ह रूग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय आणि आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालयाने स्वत: ची टीम तयार केली आहे.
25 जूनपर्यंत कोटामध्ये 700 प्रकरणे नोंदली गेली होती. जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या महिन्यात आतापर्यंत 800 हून अधिक केसेस समोर आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात कर्फ्यू आहे.