श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या सोपोरे भागातून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि सोपोरे पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारावाईमध्ये ही कामगिरी करण्यात आली. तुजार गावामध्ये ग्रेनेड हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
या आठवड्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील तुजार गावामध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तपास करताना सोपोरे पोलीस आणि लष्कराने या पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह पाच हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तसेच याबाबत अधिक तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : इबोलाचे औषध रोखू शकते कोरोनाचा प्रसार; वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्त केली शक्यता