लातेहार - विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधीच झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३ पोलिसांना प्राण गमवावे लागले. तर, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील चंदवा पोलीस ठाणे क्षेत्रातील लुकोरिया वळणाजवळ पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.
-
Correction-3 police personnel have lost their lives, 1 critically injured, in Naxal attack in Latehar district, Jharkhand pic.twitter.com/z60GzRCyV6
— ANI (@ANI) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Correction-3 police personnel have lost their lives, 1 critically injured, in Naxal attack in Latehar district, Jharkhand pic.twitter.com/z60GzRCyV6
— ANI (@ANI) November 22, 2019Correction-3 police personnel have lost their lives, 1 critically injured, in Naxal attack in Latehar district, Jharkhand pic.twitter.com/z60GzRCyV6
— ANI (@ANI) November 22, 2019
हे पोलीस दीर्घ श्रेणी योजनेनुसार (एलआरपी) निघाले होते. यादरम्यान ते लुकोरिया वळणाजवळ येऊन पोहोचले. येथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
घटनेची सूचना मिळताच चंदवा पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस घटनास्थळी रवाना झाले. लोहदरगा येथूनही पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे येथे भीतीचे वातावरण आहे.