ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमध्ये बस आणि व्हॅनच्या अपघातात तीन ठार, पाच गंभीर जखमी

व्हॅनला धडकल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खंदकात कोसळली. या बसमध्ये असलेले १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर व्हॅनमधील पाच व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कन्नौज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.

3 dead, 5 injured in bus-van collision in UP's Kannauj
उत्तर प्रदेशमध्ये बस आणि व्हॅनच्या अपघातात तीन ठार, पाच गंभीर जखमी
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:21 AM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये झालेल्या एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. कन्नौजच्या जालापूर भागामध्ये बस आणि व्हॅनची टक्कर होऊन हा अपघात घडला. यामध्ये अजित कुमार (३०), शकुंतला (३५) आणि सात वर्षांच्या आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व कानपूरचे रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅनला धडकल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खंदकात कोसळली. या बसमध्ये असलेले १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर व्हॅनमधील पाच व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कन्नौज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. गंभीर जखमींपैकी काहींना कानपूरच्या लाला लजपतराय रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्यांपैकी तिघांना तिरवामधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे. तसेच, त्यांनी जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले.

हेही वाचा : 'भारतीय लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळविण्यापासून आणखी दूर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.