बेंगळुरू - कर्नाटकातील शाहीन एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मागील काही दिवसांपासून १९३ नागरिक क्वॉरेंटाईन ठेवण्यात आले होते. या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून क्वॉरेंटाईन कालावधी संपल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
हे १९३ नागरिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे त्यांना मागील दोन आठवड्यापासून शाहीन एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ४० अद्यायावत खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. यातील ८० लोकांच्या गटाला शाहीन एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी वर्गाने टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.