ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन : परदेशात अडकलेल्या १९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना आणले मायदेशात

भारताने आत्तापर्यंत 'वंदे भारत मिशन' अंतर्गत १९ लाख ४० हजार नागरिकांना परदेशातून माघारी आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. १ ऑक्टोबरपासून या अभियानाचा सातवा टप्पा सुरू झाला असून टाळेबंदीत शिथिलता आली असली तरी हे अभियान सुरू आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:47 PM IST

नवी दिल्ली - भारताने आत्तापर्यंत 'वंदे भारत मिशन' अंतर्गत १९ लाख ४० हजार नागरिकांना परदेशातून माघारी आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लाखो नागरिक विविध देशांत अडकून पडले होते. त्यांना माघारी आणण्यासाठी भारताने हे मिशन सुरू केले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

वंदे भारत मिशनमध्ये एअर इंडियासह अनेक खासगी विमान कंपन्यांनी सहभाग घेतला होता. एक हजारांपेक्षा जास्त फ्लाईटद्वारे विविध देशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर जगभरातील विमानसेवा बंद होत्या. फक्त कार्गो विमानांना भारताने परवानगी दिली होती. अनेक देशांमध्ये टाळेबंदी असल्याने पर्यटक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसह अनेक भारतीयांचे हाल होत होते. कोविड नियमावलीचे पालन करत भारतात माघारी आणण्यात आले.

वंदे भारत मिशन अभियान विविध टप्प्यात राबविण्यात आले. १ ऑक्टोबरपासून या अभियानाचा सातवा टप्पा सुरू झाला असून टाळेबंदीत शिथिलता आली असली तरी हे अभियान सुरू आहे. मे महिन्यात परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरू करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.