ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक; पाच वाजेपर्यंत ७६.०७ टक्के मतदान

author img

By

Published : Apr 29, 2021, 9:38 AM IST

Updated : Apr 29, 2021, 10:05 PM IST

Bengal polls LIVE: Stage set for final phase of polling
LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा मतदानाचा शेवटचा टप्पा!

18:27 April 29

पाच वाजेपर्यंत ७६.०७ टक्के मतदान

कोलकाता- कोरोना महामारीच्या काळातही पश्चिम बंगालमध्ये मतदानासाठी चांगलाच उत्साह दाखविला आहे. पाच वाजेपर्यंत ७६.०७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

15:43 April 29

दुपारी तीन वाजेपर्यंत ६८.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या ३५ जागांसाठी मतदान होत आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ६८.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

13:36 April 29

दुपारपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान..

दुपारी एक वाजेपर्यंत ५६.१९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

11:37 April 29

सकाळी अकरा वाजेपर्यंत ३७.८० टक्के मतदान..

पश्चिम बंगालमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत ३७.८० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

10:25 April 29

जोरासांको मतदारसंघात बॉम्ब हल्ले..

जोरासांको मतदारसंघात महाजाती सदनसमोर बॉम्ब फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी केंद्राची सुरक्षा पथके, आणि कोलकाता पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे. तसेच, तृणमूलचे उमेदवार विवेक गुप्ताही याठिकाणी दाखल झाले असून, त्यांनी यामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे.

10:02 April 29

सकाळी नऊ वाजेपर्यंत 16.04 टक्के मतदानाची नोंद..

सकाळी नऊ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये १६.०४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.

09:33 April 29

सीपीआयएम कार्यकर्त्याला चारचाकीने उडवले; तृणमूलने हत्या केल्याचा आरोप..

मुर्शिदाबादच्या डोमकलमध्ये एका सीपीआय(एम) कार्यकर्त्याला भरधाव चारचाकीने चिरडल्याची घटना घडली आहे. कादेर अली मोंडल असे या कार्यकर्त्याचे नाव होते. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच त्याची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

09:29 April 29

अभिनेता मिथुन चक्रवर्तीने केले मतदान..

अभिनेता मिथुन चक्रवर्तीने केले मतदान..

नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर कोलकातामधील काशीपूर-बेलगाचिया परिसरातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांचे आभारही मानले. मी यापूर्वी एवढ्या शांत वातावरणात कधीही मतदान केले नसल्याचे ते म्हणाले.

09:20 April 29

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक; शेवटच्या टप्प्यातील पाच वाजेपर्यंत ७६.०७ टक्के मतदान

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. २७ मार्चला या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. आज आठवा म्हणजेच शेवटचा टप्पा आहे. आज पाच वाजेपर्यंत ७६.०७ टक्के मतदान झाले आहे. 

दुपारी १ वाजेपर्यंत ५६.१९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर दुपारी तीन वाजेपर्यंत ६८.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

शेवटच्या टप्प्यामध्ये ३५ मतदारसंघातील २८३ उमेदवारांचे भविष्य पणाला लागणार आहे. यामध्ये बिरुभम आणि मुर्शिदाबादमधील प्रत्येकी ११, उत्तर कोलकातामधील सात आणि मालदामधील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

आतापर्यंतच्या सर्व टप्प्यांमध्ये बऱ्याच हिंसाचाराच्या घटना पहायला मिळाल्या, त्यामुळे हा शेवटचा टप्पा तरी शांततेत पार पाडण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे. तसेच, देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे मतदान पार पडणार आहे.

Last Updated : Apr 29, 2021, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.