ETV Bharat / bharat

शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही, हा विद्यार्थी रोज घोड्यावर बसून शाळेत जातो ! - घोड्यावर स्वार होऊन शाळेत जाणारा ललित

बालाघाट येथील ललितकुमार कडोपे (Balaghat student Lalit Kumar) हा मुलगा घोड्यावर स्वार होऊन शाळेत जातो. खडतर रस्त्यामुळे रोज शाळेत जाणे ललीतसाठी अवघड होते. मात्र हार न मानता त्याने घोडेस्वारी शिकून घोड्यावरून शाळेत जाण्याचे ठरवले. (student goes to school by horse). जाणून घेऊया विद्यार्थ्याची संपूर्ण कहाणी त्याच्याच शब्दात..

Balaghat student Lalit Kumar
Balaghat student Lalit Kumar
author img

By

Published : Nov 21, 2022, 7:41 PM IST

बालाघाट (मध्य प्रदेश) - आजपर्यंत तुम्ही सायकल, मोटारसायकल किंवा चारचाकीने शाळेत जाणारे विद्यार्थी पाहिले असतील, पण आज आपण अशा एका विद्यार्थ्याला भेटणार आहोत जो राजा महाराजांसारखी घोडेस्वारी करत शाळेत पोहचतो! होय हे खरं आहे. बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी आदिवासी झोन ​​गावातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी ललित कुमार कडोपे (Balaghat student Lalit Kumar) शाळेत जाण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहन न वापरता चक्क घोडा वापरतो! (student goes to school by horse).

बालाघाट येथून ग्राउंड रिपोर्ट

शाळेत जाण्यासाठी खडतर रस्ता - गरीब कुटुंबातील ललित हा सरकारी माध्यमिक विद्यालय खैरलांजी येथे इयत्ता सहावीचा विद्यार्थी असून तो आपल्या आजी-आजोबांच्या घरी शिकतो आहे. नानिहाल ते शाळेचे अंतर 4 किलोमीटर आहे. वाटेत रस्ता नाही, पण अभ्यासासाठी दररोज 4 किलोमीटर जाणे आणि परत येणे हा विद्यार्थी ललितसाठी खडतर प्रवास होता. अभ्यास करून पुढे जाण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्याने ही अडचण त्याला दूर करायची होती. त्याच्या मामाच्या घरी घोडा होता. त्यामुळे ललितने शाळेत जाण्यासाठी घोड्याचाच उपयोग करण्याचे ठरवले.

रोज शाळेत घोड्यानेच जातो - ललित दररोज घोड्यावर स्वार होऊन मोठ्या अभिमानाने शाळेत जातो. अभ्यास करताना तो शाळेजवळच्या शेतात घोडा बांधतो. त्या दरम्यान घोडा शेतात चरत राहतो. यानंतर ललितची शाळा संपल्यावर तो पुन्हा घोड्यावर बसून आपल्या घरी परत येतो. आजच्या आधुनिक युगात घोड्यावर स्वार होऊन शाळेत जाणारा विद्यार्थी दिसणे हे आश्चर्यकारक आहे. ललितला घोड्यावरून शाळेत जाताना कुणीही पाहिलं की तोही थक्क होतो.

ललितची कहानी प्रेरणादायी - बालाघाट येथील ईटीव्हीच्या रिपोर्टरने घोड्यावर स्वार होऊन शाळेत जाणाऱ्या ललितची भेट घेतली आणि त्याच्याशी चर्चा केली. ललितला घोड्यावर बसून शाळेत जाण्याचे कारण विचारले असता ललित म्हणाला, "मला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी काहीतरी करावेच लागेल, या नादामुळे मी शाळेत ये-जा करण्यासाठी घोड्याचा वापर करतो. घोड्यावर स्वार होऊन शाळेत येण्याचा आनंद वेगळाच असतो." ललितकडे पाहून असे वाटते की, कुठल्याही अडचणीवर मात करून व्यक्ती पुढे जाऊ शकतो. ललितची ही कहानी दुर्गम भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.