लखनौ - सीतापूरमधील बाबा बजरंग मुनीने मुस्लिम महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्याने केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी बाबा बजरंग मुनीला पोलिसांनी ( Baba Bajrang Muni arrested ) अटक केली आहे. अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मुस्लिम धार्मिक स्थळाबाबत बाबा बजरंग मुनीने प्रक्षोभक ( Bajrang Muni viral video ) भाषणे दिले होते. मुस्लिम महिलांचे अपहरण करून धमक्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. व्हायरल झालेला व्हिडिओ सीतापूरमधील खैराबादचा आहे. त्याचबरोबर पोलिसांनी व्हिडिओ तपासून कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल ( police case against Bajrang Muni ) केला. यानंतर पोलिसांनी 11 दिवसानंतर बजरंग मुनीला अटक केली आहे.
काय होते व्हायरल व्हिडिओमध्ये?- एका व्हायरल व्हिडिओमध्ये, सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद येथील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करत आहे. भगवा परिधान केलेला युवक एका मुस्लिम धर्मस्थळाबद्दल चिथावणीखोर भाषण करताना दिसत आहे. यासोबतच तो मुस्लिम महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेला कथित महंत म्हणत आहे की, मुस्लिम भागातील मुलीची कोणी छेड काढली तर, मुस्लिम महिलांचे अपहरण करून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करेल, असेही तो आपल्या भाषणात म्हणत आहे. तर दुसरीकडे जय श्री रामचा नारा देत जमाव त्यांचा जयजयकार करत आहे.
हेही वाचा-125 Gold Roses Gift : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना 125 सोन्याच्या गुलाबांचा गुच्छ भेट
हेही वाचा-सामाजिक ऐक्याचे उदाहरण: रमजानच्या कार्यक्रमाकरिता मंदिराचा परिसर ग्रामस्थांकडून उपलब्ध