ETV Bharat / bharat

Youngest Mountaineers : जगातील सर्वात ऊंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून विश्वविक्रम करणारे बहीण-भाऊ

देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी रविवारी साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त ईटीव्ही भारतने असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांचे कतृत्व बालवीर या लेख मालिकंतून मांडले आहे..

Youngest Mountaineers
Youngest Mountaineers
author img

By

Published : Nov 15, 2021, 6:34 PM IST

Updated : Nov 15, 2021, 7:13 PM IST

ग्वाल्हेर - ज्या वयात मुले खेळण्यांबरोबर खेळतात किंवा आजच्या जमान्यातील मुले टॅब-मोबाइलवर गेम खेळण्यात व्यस्त असतात. त्या लहान वयात ग्वाल्हेरच्या बहीण-भावाने जगातील सर्वात ऊंच पर्वत माउंट एवरेस्ट सर करून विक्रम प्रस्तापित केला. कंदर्प व रित्विका (Ritwika and Kandarp ) ही दोन मुले आहेत, (mountaineers) जी पाच हजाराहून अधिक उंचीवर पोहोचली आहेत.

छोट्या पावलांनी Everest सर -

ज्या वयात मुले व्यवस्थित धावू शकत नाहीत. त्या वयात ग्वाल्हेरमधील भाऊ-बहीण रित्विका व कंदर्प यांनी माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. या दोन्ही छोट्या पर्वतारोहींनी नेपाळमधील माऊंट एव्हरेस्टचे शिखर व काळा दगड सर करून विश्वविक्रम स्थापित केला आहे. या बहीण भावाने माउंट एव्हरेस्ट बेस आणि काळा दगडावर पोहचून भारतीय झेंडा फडकवला व देशातील सर्वात यंगेस्ट माउंटेनियर (Mount Everest ) होण्याचा गौरव प्राप्त केला. (Ritwika and Kandarp reached Everest base camp) विश्वविक्रम करताना रित्विकाचे वय 8 वर्ष भाऊ कंदर्पचे वय 5 वर्ष होती. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नेपाळचे उपराष्ट्रपती व नेपाळमधील भारतीय राजदुतांनी या दोन्ही मुलांचे कौतुक केले. विशेष म्हणजे या बहीण-भावाचे प्रशिक्षक त्यांचे वडीलच होते.

रित्विकाला बालपणापासून होती पर्वत चढाईची इच्छा -

छोट्या वयात रित्विका आणि कंदर्प यांनी अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये पाऊल ठेवले होते. (youngest mountaineers of India) दोन्ही मुलांची पात्रता पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केला. या मुलांचे वडीलही अॅडवेंचर स्पोर्ट्सचे प्रशिक्षक राहिले आहेत.

भारतातील सर्वात छोटे गिर्यारोहक

कठोर प्रशिक्षणाचे मिळवले यश -

पिता भूपेंद्र शर्मा यांनी सांगितले की, लहानपणापासून ते दोन्ही मुलांना ग्वाल्हेर किल्ल्यावर नेऊन प्रशिक्षण देत होते. आपल्या वडिलांच्या मदतीने रित्विकाने केवळ वयाच्या दुसऱ्या वर्षी ग्वाल्हेर किल्ल्यावर Rock Climbing आणि रॅपलिंगची तयारी सुरू केली होती. (World record of Ritwika and Kandarp) जेव्हा रित्विका पाच वर्षाची झाली तेव्हा वडील तिला घेऊन लेह-लद्दाखमध्ये वर्ल्ड मोटरेबल पास ऑफ वर्ड घेऊन गेले. त्यांची समुद्रसपाटीपासून ऊंची 18 हजार 340 फूट आहे. तेथे रित्विकाच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज आला व त्यानंतर वडिल अनेकवेळा ऊंच पर्वतांवर तिला घेऊन गेले.

रित्विकाने आठव्या तर कंदर्पने पाचव्या वर्षी सर केला एव्हरेस्ट -

रित्विका व कंदर्प यांनी वेगवेगळे विश्वविक्रम स्थापित केले आहेत. रित्विकाने 8 व्या वर्षी 18 हजार 200 फूट ऊंच काळा दगड व माउंट एव्हरेस्ट बेस कँप सर करून देशातील यंगेस्ट गर्ल माउंटेनियर होण्याचा सन्मान मिळवला होता. त्याचबरोबर कंदर्पने 5 वर्ष 4 महिने इतक्या कमी वयात 2014 चा विश्वविक्रम मोडला. कंदर्पच्यापूर्वी दिल्लीच्या हर्षित सेमित्र याने 5 वर्ष 11 महिने या वयात हा विक्रम केला होता. माउंट एव्हरेस्टच्या आधार शिबिरात या बहीण भावासोबत त्यांचे आई-वडीलही उपस्थित होते. रित्विका व कंदर्प यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, वडिलांना आमच्यासाठी केलेल्या मेहनतीच्या बळावर आम्ही हे यश मिळवले आहे. बालपणापासून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले.

चढाई करण्यापूर्वी झाला होता भूकंप -

रित्विका व कंदर्प यांनी छोट्य़ा वयात केलेल्या मोठ्या कामगिरीमुळे नेपाळचे उपराष्ट्रपती व नेपाळमधील भारतीय राजदूत यांनी या दोन्ही मुलांच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. या दोन्ही बहीण भावाने माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यापूर्वी नेपाळमध्ये भूकंप झाला होता व त्यामुळे हजारो टन वजनाने भूखंड त्यांच्या रस्ता अडवून उभे होते. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारत स्काउट अँड गाईडच्या अॅडव्हेंचर ओपन दलाच्या पाच वर्षाच्या कंदर्प आणि 8 वर्षाच्या रित्विका शर्मा यांनी पूर्ण उत्साहात गिर्यारोहन केले.

स्काय डायविंगमधील विक्रम -

रित्विकाला बालपणापासूनच घोडेस्वारीचा छंद होता. तिचे आई-वडिलही घोडेस्वारीचे चँपियन आहेत. एक वर्षात रित्विकाही घोडेस्वारीमध्ये चँपियन बनली. हॉर्स रायडिंगमध्ये तिला अनेक अवार्ड मिळाले आहेत. रित्विका जलतरणातही पारंगत आहे. बंगालच्या खाडीत अंदमानच्या खुल्या समुद्रात स्कूबा डायविंग करुन यंगेस्ट स्कूबा डायवरचा विश्व विक्रमही तिने आपल्या नावावर केला आहे.

Last Updated : Nov 15, 2021, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.