अयोध्या Ayodhya under AI surveillance : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) निगराणी सुरू केली जाऊ शकते. या एआय निगराणी व्यतिरिक्त 11 हजार पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान राम मंदिराच्या उद्घाटनदिनी सुरक्षेसाठी तैनात केले जाण्याची शक्यता असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय.
प्रत्येक कामावर ठेवलं जाईल लक्ष : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, अयोध्येसाठी एआय (AI) पाळत ठेवण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाऊ शकतो. काही काळानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यास तो सुरक्षिततेचा अविभाज्य भाग बनविला जाऊ शकतो. राम मंदिराबाबत धमक्या येत आहेत. अशा परिस्थितीत अयोध्येत कडक बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. एआय (AI) पाळत ठेवणं कोणत्याही सामान्य ट्रेंडचं अनुसरण करण्यात मदत करु शकतं. यामुळं एजन्सी सतर्क राहतील. त्यानुसार योग्य ती कारवाई करू शकतील.
यूपी पोलिसांनी वाढवलं लक्ष : उत्तर प्रदेश पोलिसांनी उद्घाटन सोहळ्याच्या तयारीसाठी मॅन्युअल तसंच सोशल मीडियावर आधीच लक्ष ठेवायला सुरू केलंय. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची सुरक्षा योजना अद्याप निश्चित झालेली नाही. राज्य आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारी अजूनही धोक्याची धारणा आणि सुरक्षेच्या आवश्यकतेचे विश्लेषण करत आहेत. राम मंदिर असलेल्या रेड झोनमध्ये मॅन्युअल तसंच व्हिडिओ पाळत ठेवून प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी इंटेलिजन्स युनिटचे 38 अधिकारी तैनात असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलंय.
22 जानेवारीला कशी असेल सुरक्षा व्यवस्था : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, या कार्यक्रमात सुमारे 8 हजार नागरी पोलीस कर्मचारी तसंच निमलष्करी दलाच्या 26 कंपन्या आणि पीएसी तैनात केले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच यूपी अँटी टेरर स्क्वॉड (एटीएस) आणि स्पेशल टास्क फोर्स आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डसारख्या केंद्रीय एजन्सींची टीमही तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी अयोध्येकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्घाटनासाठी येणाऱ्या कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत.
हेही वाचा :